BJP Politics News : मोदींचं नाव घेत भाजप नेत्यानं कमलनाथ यांच्याविरोधात फडकावलं निशाण   

Tajinder Pal Singh Bagga : तजिंदर बग्गा यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे.
Kamal Nath, Tajinder Pal Singh Bagga
Kamal Nath, Tajinder Pal Singh BaggaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे खासदार पुत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण त्याला आता भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपचे नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमलनाथ यांच्याविरोधात पहिलं निशाण फडकावलं आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BJP Politics News)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. पण दुसरीकडे कमलनाथ (Kamal Nath) यांना भाजपमधून विरोध होत आहे. बग्गा यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, कमलनाथ हे 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीतील आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. 

Kamal Nath, Tajinder Pal Singh Bagga
Congress News : काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? आणखी एका बड्या नेत्यानं वाढवलं टेन्शन...

मी आठ दिवस उपोषण केल्यानंतर कमलनाथ यांच्याविरोधात एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली होती. रकाबगंज गुरूद्वारा जाळण्यामागेही त्यांचाच हात होता. त्यामुळे भाजपमध्ये कमलनाथ यांना अजिबात जागा नाही, असे बग्गा यांनी स्पष्ट केले. याबाबत मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी नेहमीच कमलनाथ यांच्याविरोधात आहे. पण त्यांच्या मुलाला भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत मला काहीच अडचण नाही. मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. भाजपमध्ये कमलनाथ यांच्यासाटी सर्व दरवाजे बंद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना हे शक्य होणार नाही, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असे ट्विट बग्गा यांनी सकाळी केले होते.

दरम्यान, कमलनाथ हे राज्यसभा उमेवारीसाठी आग्रही होते. पण त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यावरून ते नाराज असल्याचीही चर्चा आहेत. तसेच काही महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजपला तब्बल 163 जागा मिळाल्या. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. मागील वर्षीच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Kamal Nath, Tajinder Pal Singh Bagga
Amit Shah News : पवारांना त्यांच्या मुलीला अन् ठाकरेंना त्यांच्या मुलाला..! अमित शहांचा दिल्लीतून निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com