Rahul Gandhi parliament news : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार डॉ. संबित पात्रा यांनी मुजफ्फरपूर चेंबर ऑफ कॉर्मर्समध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पाबाबत बैठक घेतली. यानंतर मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना संबित पात्रा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विकासावर अधिक लक्ष आहे आणि ते सातत्याने यासाठी प्रयत्नशील आहेत व नवनवीन योजना राज्याला देत आहेत. त्यांनी अर्थसंकल्पात बिहारला प्राथमिकता दिली गेल्याचे समर्थन केले आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार बनणार असल्याचा दावा केला.
त्यांनी यादरम्यान नितीश कुमा(Nitish Kumar)र यांच्या 'राजद'सोबत जाण्याच्या चर्चांना फेटाळून लावले आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री नितीशकुमार गैरहजर राहिल्याबाबतच्या प्रश्नासही उत्तर दिले. तसेच संबित पात्रा यांनी नितीशकुमारांबाबत राजद नेत्यांच्या वक्तव्यांना त्यांची नैराशातून केली जात असलेली विधाने म्हटले. एवढंच नाहीतर संबित पात्रा यांनी तो किस्साही सांगितला जेव्हा राहुल गांधींनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आपल्या खिशातून कागद काढला आणि प्रियंका गांधींच्या इशाऱ्यानंतर तो परत खिशात ठेवला.
खरंतर संसदेत अर्थसंकल्प सादर होत असताना जेव्हा 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असेल, अशी घोषणा झाली तेव्हा याबाबतचा एक किस्सा संबित पात्रा यांनी सांगितला, जो राहुल गांधींशी निगडीत होता. संबित पात्रा यांनी अर्थसंकल्पावरून विरोधकांवर टीका करताना म्हटले की, विरोधी पक्षांचे नेते दरवर्षी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच त्यांना शिकवलेली आणि त्यांच्याकडून घोकून घेतलेली वाक्यं कागदावर लिहून आणत होते. ते ठरवून येत होते की अर्थसंकल्पावर टीका करायची आहे. मात्र यावेळी जेव्हा राहुल गांधींनी खिशातला कागद काढणे सुरू केला, मात्र तितक्यात प्रियंका गांधी(Priyanaka Gandhi) यांनी इशारा केला आणि कागद परत खिशात गेला.
संबित पात्रा यांनी सांगितले की, जेव्हा घोषणा झाली तेव्हा सर्वजण खूश होते. मात्र जेव्हा 12 लाखांपर्यंचे उत्पन्न आयकर मुक्त करण्याबाबतची घोषणा झाला, तेव्हा विरोधकांना प्रश्न पडला की आता टीका कशी करायची? यावेळी हे शक्य झाले नाही. यावेळीही संसदेत काही असंच झालं होतं की, राहुल गांधींनी(Rahul Gandhi) आधीच आपलं भाषण तयार केलेलं होतं आणि राहुल गांधी जेव्हा खिशातून कागद काढत होते, तेव्हा आम्ही बघितलं की त्यांचे बाकी खासदार आणि प्रियंका गांधी यांनीही कागद खिशात टाकण्याचा इशारा केला. मागून काही खासादारांनीही हेच सांगितले. शक्यता आहे की यानंतर तत्काळ राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेबाबतची आपली आधीच लिहून आणलेले भाषणाची चिठ्ठी खिशात ठेवली.
असं यामुळे झालं की त्यांना माहीत होतं की, त्यामध्ये मध्यम वर्गासाठी काहीच खास नाही, असं लिहिलेलं आहे. जर राहुल गांधींनी म्हटलं असतं की मध्यमवर्गासाठी काहीच नाही, तर मात्र काँग्रेसच चांगलीच अडचणीत सापडली असती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.