Navneet Rana : नवनीत राणांच्या 'बस्स 15 सेकंद काफी...'अंगलट; आता हैदराबाद कोर्ट म्हणतं 'हाजिर हो...'; 'हे' आहे प्रकरण

Navneet Rana Controversial Statement : माजी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवैसी यांना आव्हान देणारे वक्तव्य भोवलं आहे. त्यांना हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहून ओवैैसींच्या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
Navneet Rana .jpg
Navneet Rana .jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयामार्फत बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असून लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ओवेसी यांना आव्हान देताना प्रक्षोभक विधान केलं होतं.

लोकसभा निवडणुकीवेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे ('एआयएमआयएम') प्रमुख ओवेसी यांच्याविरोधात भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली होती. हैदराबाद मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवार देत 2004 पासून येथे खासदार असणाऱ्या औवेसींनी ओवेसी यांच्यासमोर आव्हान उभे केलं होते.

प्रचारादरम्यान नवनीत राणा यांना एआयएमआयएम' नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 2013 चा वक्तव्याचा मुद्दा उचलत ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ओवेंसींवर जोरदार हल्‍लाबोल करताना, हैदराबादचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे भाऊ म्हणाले होते की, 'पोलिसांना 15 मिनिटांसाठी काढून टाका म्हणजे आम्ही काय करू शकतो ते दाखवू', मला ओवेंसीला सांगायचे आहे की, तुम्हाला 15 मिनिटं लागतील. पण आम्हाला, 15 मिनिटं नहीं 15 सेकंद काफी है. आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही 15 सेकंदात अकबरुद्दीन कोठून आला आणि कुठे गेला हे देखील कळणार नाही, असेही वक्तव्य केलं होते.

Navneet Rana .jpg
Navneet Rana: राणेंपाठोपाठ आता नवनीत राणाही आक्रमक; मोदी-शाहांकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या,वक्फ बोर्ड बंद करा अन्...

याच वक्तव्याविरोधात ओवैसी यांनी न्यायालयामार्फत नवनीत राणा यांना नोटीस पाठवली. त्याच नोटीसला उत्तर देण्यासाठी कोर्टाने नवनीत राणा हैदराबाद कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. तर त्यांना 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहावं लागणार आहे. ओवैसी यांच्या बद्दल नवनीत राणा यांनी केलेलं वक्तव्यच आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Navneet Rana .jpg
Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा, आक्रमक कार्यकर्त्यांनी अंगावर खुर्च्या फेकल्याचा VIDEO व्हायरल

काय म्हणाले होते अकबरुद्दीन?

2013 मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका कार्यक्रमात, जर 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आपण (25 कोटी मुस्लिम) 100 कोटी हिंदूंना नष्ट करू, असे विधान केलं होतं. या वक्तव्यावरून त्यावेळी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. तर याच मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी ओवेसी यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केले. यानंतर आता त्यांना हैदराबाद कोर्टात कोर्टाची नोटीस आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com