Sheikh Shahjahan  Sarkarnama
देश

Sandeshkhali Violence Case : अख्खं बंगाल हादरवणाऱ्या तृणमूलच्या फरार नेत्याला अखेर बेड्या ठोकल्या

Sheikh Shahjahan Arrest : शाहजहान शेख हे तब्बल 55 दिवस फरार होते. त्यांच्या अटकेसाठी भाजपसह काँग्रेस व डाव्या पक्षांनी ममता सरकारवर दबाव टाकला होता.

Rajanand More

West Bengal News : मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. भाजपसह काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बंगालमध्ये आंदोलन करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला धारेवर धरले होते. महिलांनीही अनेकदा रस्त्यावरून उतरून आंदोलन केले. खुद्द राज्यपालही रस्त्यावर उतरले. त्यामुळे अख्खं बंगाल काही दिवसांपासून धुमसत आहे. बंगालमधील संदेशखाली (Sandeshkhali Violence Case) भागात महिलांवर झालेल्या अत्याचारातील प्रमुख आरोपी असलेला तृणमूलच्या नेत्यामुळे ममतांच्या अडचणी वाढल्या. अखेर आज या नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या.   

संदेशखाली येथील हिंसेच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख (TMC Leader Sheikh Shahjahan) याला मध्यरात्री बंगाल पोलिसांनी अटक केली. शेख जवळपास 55 दिवस फरार होता. मागील महिन्यात पाच तारखेला जवळपास एक हजार लोकांनी एकत्रित येत ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. कथित रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ही टीम शेख यांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेली होती. तेव्हापासून शेख फरार आहे.

त्यानंतर काही दिवसांतच संदेशखाली येथील महिलांनी शेख व त्याच्या इतर सहकाऱ्यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. या भागातील महिलांनी उघडपणे त्यांच्याविरोधात बोलायला सुरूवात केली. महिलांनी आंदोलन करत या मुद्दयाकडे लक्ष वेधले. तेव्हापासून बंगालमध्ये (West Bengal) विरोधी पक्षांनी बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधण्यास सुरूवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यपालांसह अनुसूचित जाती आयोग, महिला आयोगातील सदस्यांनीही संबंधित महिलांची भेट घेत स्थिती जाणून घेतली. एससी आयोगाने तर राष्ट्रपतींकडे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. ममतांच्या (CM Mamata Banerjee) राजीनाम्याची मागणी विरोधकाकडून केली जात होती. ममता सरकारकडून शेखला संरक्षण दिले जात असल्याची टीका अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर मध्यरात्री पोलिसांनी शेखला अटक केली. त्यानंतरही भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेत ममतांना लक्ष्य केले आहे.

काय आहे संदेशखाली प्रकरण?

संदेशखालीमधील अनेक महिलांनी तृणमूलचे स्थानिक नेते शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी ते घरी मुलींना घेऊन जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांकडून तृणमूलच्या नेत्यांविरोधात आंदोलन केले जात असून, त्याला भाजपचीही साथ मिळत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मागील महिन्यात शेख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी स्थानिकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT