Rajya sabha Election 2024 : राज्यसभेत भाजप अजूनही बहुमतापासून दूरच; कुणाचे किती खासदार?

BJP Political News : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 30 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी 20 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
PM Narendra Modi, Parliament
PM Narendra Modi, ParliamentSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभेत निर्विवाद वर्चस्व असलेल्या भाजपला राज्यसभेत अजूनही बहुमत मिळवता आलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya sabha Election 2024) भाजपला 56 पैकी 30 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी 20 जागांवर बिनविरोध विजय मिळाला आहे. त्यानंतरही भाजपच्या राज्यसभेतील खासदारांचा आकडा शंभरी गाठू शकलेला नाही. तर एनडीएलाही बहुमताजवळ पोहचता आलेले नाही.

देशभरात 56 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्यापैकी 41 खासदार बिनविरोध निवडून आले. तर उत्तर प्रदेशातील दहा, कर्नाटकातील चार आणि हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एक जागेसाठी मतदान झाले. त्यामध्ये भाजपला दहा जागा मिळाल्या. तर 20 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. भाजपला एकट्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सर्वाधिक दहा जागा मिळाल्या आहेत.

PM Narendra Modi, Parliament
Jaya Bachchan News : जया बच्चन यांचा राजकीय ‘सिलसिला’ सुपरहिट; यादवांच्या राजकारणाची ही आहे Inside Story

निवडणुकीनंतर राज्यसभेतील चित्र स्पष्ट झाले आहेत. राज्यसभेत एकूण 240 जागा आहेत. निवडणुकीनंतर भाजपकडे (BJP) 97 खासदार झाले असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे (Congress) 29 खासदार आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस 13, द्रमुख आणि आपचे प्रत्येकी दहा, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी नऊ, बीआरएसचे सात, राष्ट्रीय जनता दलाचे सहा, सीपीएमचे पाच तर अण्णा द्रमुक आणि संयुक्त जनता दिलाचे प्रत्येकी चार खासदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप आणि मित्र पक्षांचे मिळून खासदारांची संख्या 117 वर पोहचते. राज्यसभेत बहुमतासाठी 121 हा जादुई आकडा आहे. त्यापासून एनडीए सध्या केवळ चारने लांब आहे. असे असले तरी मागील दहा वर्षात भाजपला राज्यसभेत कधीही अडचण आली नाही. एनडीएमधमध्ये नसलेल्या बीजेडी, वायएसआर काँग्रेस व इतर पक्ष अनेकदा भाजपच्या मदतीला धावून गेले आहेत.

PM Narendra Modi, Parliament
Congress MLAs Disqualification Case : काँग्रेसचे सहा आमदार अपात्रतेच्या फेऱ्यात; विधानसभा अध्यक्ष देणार निकाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com