Sanjay kumar Nishad speech Sarkarnama
देश

Minister emotional speech : भाषण करताना मंत्री स्टेजवरच ढसाढसा रडले; म्हणाले, त्यांना बरबाद करा...

Sanjay kumar Nishad speech : आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. निषाद समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना तुमच्या मतांनी बरबाद करा, असे आवाहन मंत्र्यांनी उपस्थितांना केले.

Rajanand More

Emotional political speech india : विविध कार्यक्रम असो की सभा, अनेकदा आपण राजकीय नेत्यांना स्टेजवरच रडताना पाहिले आहे. असाच एक प्रकार टक्कर राज्य सरकारमधील मंत्र्यांबाबत घडला आहे. या मंत्र्यांना भाषण करताना स्टेजवरच रडू कोसळले. पण त्यांनी भाषण करणे थांबविले नाही. खिशातला रुमाल काढून डोळे पुसत राहिले. रडता-रडताच त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री व निषाद पक्षाचे नेते संजय निषाद असे त्यांचे नाव आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. यापार्श्वभूमीवर निषाद यांच्या आजच्या भाषणाकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये पक्षाच्या सभेत संजय निषाद यांना भाषण करताना रडू कोसळले.

भाषणादरम्यान निषाद म्हणाले, आपल्या लोकांना मागील सरकारांनी लुटले. महिलांनी अब्रु लुटण्यात आली. मुलांना पुढे येऊ दिले नाही. आपला पक्ष उभा करा. तुम्ही उभे राहिला तर पक्ष उभा राहील. मागील सरकारने लुटण्याचे काम केले. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साथ दिली, असे सांगत असतानाच निषाद रडू लागले.

आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. निषाद समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना तुमच्या मतांनी बरबाद करा, असे आवाहन निषाद यांनी उपस्थितांना केले. तुमच्या मुलींचा सन्मान हिरवण्यात आला तेव्हा विरोधक आरोपींसोबत केले. मी सभागृहात आवाज उठविल्यानंतर आरोपींविरोधात बुलडोझर कारवाई करण्यात आला. उच्चवर्णीय जातीतील लोक तुमचा वाटा घेत नाही तर समाजवादी पक्ष आणि बीएसपी हे करत आहे, अशी टीकाही निषाद यांनी केली.

दरम्यान, निषाद यांच्या आजच्या रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. जनमत प्रभावित करण्यासाठी ही स्टंटबाजी असल्याची टीका काही जणांकडून केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT