Sanjay Raut, Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Sanjay Raut News: आधी औरंगजेब आता कंसमामा; संजय राऊतांची टीका आणखी टोकदार, मोदी-शाहांवर केला 'हा' आरोप

Sanjay Raut On Narendra Modi: शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करताना मोदींना नाव न घेता कंसाची उपमा दिली आहे. राऊतांच्या या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut On Narendra Modi : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधून सुरू असतानाच कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. केजरीवालांना अटक केल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे, तर आपचे कार्यकर्ते देशभरात या अटकेचा निषेध करत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करताना मोदींना नाव न घेता कंसाची उपमा दिली आहे. राऊतांच्या या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केजरीवालांना जनतेने निवडणून दिलं

केजरीवालांच्या अटकेशी संबंधित प्रश्नावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकार देशभरातील आपल्या विरोधकांना नष्ट करून देश आता चीन, रशियाच्या पुतिन यांच्या मार्गाने चालला आहे. ईडीच्या (ED) मदतीने केजरीवालांना तुरुंगात पाठवून त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal) राजीनामा देत नसतील तर भाजपने त्याची चिंता करण्याची गरज नाही. केजरीवालांना जनतेने निवडणून दिलं आहे, ईडी, सीबीआयने नव्हे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री राहावं की नाही ते लोक ठरवतील, असं संजय राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमच्या कंस मामाला भीती वाटते -

तसेच कंसाला ज्याच्यापासून भीती वाटत होती, त्यांना त्याने तुरुंगात टाकलं होतं. त्याने देवालादेखील तुरुंगात टाकले होते. शेवटी त्याच तुरुंगात श्रीकृष्णांचा झाला आणि त्यांनी कंसाचा वध केला. आपल्या देशात तीच परिस्थिती आहे, आमच्या कंसमामाला ज्याची भीती वाटते, त्या सर्वांना तो तुरुंगात टाकत आहे.

राऊतांचा हल्लाबोल आधी औरंगजेब आता कंसमामा

खासदार संजय राऊत यांना बुलडाणा येथील सभेत मोदींना (Narendra Modi) औरंगजेब (Aurangzeb) म्हटलं होतं. या सभेत ते म्हणाले होते, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जम्नाला आले आणि औरंजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्याच बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबची वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेना आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात चाल करून येत आहे"

(Edited By - Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT