Sanjay Raut Latest Marathi News  Sarkarnama
देश

'नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे…उद्या 'मातोश्री'वर कब्जा करतील'

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या 'मातोश्री' आमचे आहे, असेही म्हणतील अशी खरमरीत टिका शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही, असेही ते म्हणतील. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना व बाळासाहेबांचा संबंध नाही, असेही ते सांगतली, असा टोला राऊतांनी लगावाला आहे.

संजय राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना भवन, सामना, 'मातोश्री' डोक्यात असेल तर यांचे मेंदू तपासा असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ५० आमदारांच्या घरानंतर आता खासदारांनाही सुरक्षा दिली जात आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणांचा, पैशांचा वापर होत आहे तसेच ब्लॅकमेलिंग देखील केले जात आहे. मात्र, आम्ही जे होईल ते पाहून घेऊ. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी, लढा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर ती त्यांची नेहमीची भेट आहे, ते भाजपचे (BJP) मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत यावे लागेले. मंत्रिमंडळ तयार करायचे असेल मंत्र्यांची यादी करायची आहे. मात्र, मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रिमंडळाची यादी किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे ऐकले नाही, असेही राऊत म्हणाले.

त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईत होत होत्या. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असतात, त्यासंबंधी टीका करणार नाही. मात्र, जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वर करुन त्यांच्याकडे पाहणार, असेही राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT