'कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता?' राष्ट्रवादीच्या नेत्याने कदमांना सुनावले...

Ramdas kadam| Rupali thombre Patil| रामदास कदम यांनी देखील नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला रामराम केला.
Rupali thombre Patil|Ramdas kadam|
Rupali thombre Patil|Ramdas kadam|
Published on
Updated on

मुंबई: शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी देखील नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला रामराम केला. शिवसेना सोडताना इतर आमदारांप्रमाणे त्यांनीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले. माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असं 52 वर्षात कधीच वाटलं नाही. पण शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधत पक्ष फोडला. तरीही उद्धव ठाकरेंना पवार आणि सोनिया गांधी सोडवत नाही. पक्ष फुटत असताना शरद पवार कशासाठी हवे आहेत, असा सवालही कदम यांनी केला.

Rupali thombre Patil|Ramdas kadam|
गणेश नाईकांचा शिंदे गटाला पहिला धक्का; तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल

या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या बंडखोरांवर निशाणा साधत त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. रुपाली पाटील यांनी ट्विट करत रामदास कदम यांच्यासह बंडखोर आमदारांना सुनावले आहे. "शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर मा.शरदजी पवार साहेबांवर फोडता. #सत्तापिपासूपणामुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला.'' अशा शब्दांत रुपाली पाटलांनी कदम यांना सुनावले आहे.

शिवसेनेतील ज्या आमदारांनी बंडखोरी केली, त्यातील अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप केले. त्यानंतर रामदास कदम यांनीदेखील शरद पवार यांच्यावर आरोप करत शिवसेना सोडली. मी राजीनामा दिला असला तरी खूप अस्वस्थ आहे. पक्षात 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा देतो, याचा विचार पक्षप्रमुखांनी करायला हवा. मी आनंदी नाही, वेदना होत आहेत. राष्ट्रवादीसोबत जाऊ नका, असं हात जोडून सांगितले होते. पण उद्धव ठाकरे बोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही, अशी टीकाही कदम यांनी केली.

आमदारांच्या नाराजीची नोंद उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर ही वेळच आली नसती. पक्षातून किती जणांची हकालपट्टी करणार, असा सवाल करत कदम यांनी तुमच्या आजुबाजूला कोण आहे हे आधी पहा, असं आवाहनही केलं. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला असताना त्यांच्याशी बोललो. पण त्यात यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजूला करावं, असं कदम म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com