<div class="paragraphs"><p>Sanjay Raut&nbsp;</p></div>

Sanjay Raut 

 

sarkarnama

देश

तुम्ही ५० खासदारांना निलंबित करा पण...राऊतांचे मोदी सरकारला आव्हान!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे. मात्र, चर्चा सुरू आहे ती विरोधकांनी संसदेच्या बाहेर सुरू केलेल्या आंदोलनाची. गेल्या महिन्याभरापासून विरोधी पक्षांच्या १२ निलंबित खासदारांचे संसदेबाहेर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन सुरू आहे. त्यासोबतच, लखीमपूर खिरीच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी आता विरोध तीव्र केली आहे. आज (ता. २१) दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत माध्यमांशी बोलताना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारला खुले आव्हान दिले.

लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यंना चिरडणाऱ्या आशिष मिश्राचे वडील आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा राजीनामा घेतला जावा. त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. केंद्र सरकार अद्याप कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांचा सूर अधिकच तीव्र झाला आहे. या वेळी संजय राऊत यांनी लखीमपूर खिरीबाबतच्या मागणीवर विरोधक ठाम असल्याचे सांगितले. संसदेचे सत्र संपू शकते. ते सरकारच्या मर्जीने होईल. मात्र, मला वाटते लखीमपूर खिरीचा लढा संपणार नाही. पूर्ण जगाने पाहिले की कशा प्रकारे मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. मात्र, आमच्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी ते पाहिले नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. ही एसआयटी तर तुम्हीच तयार केली. त्यांचा अहवाल आला. मात्र, तरीही तुम्ही ऐकायला तयार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आम्हालाच प्रश्न विचारतात की महाराष्ट्रात काय चालल आहे. मात्र, तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली काय घडत आहे, हत्या होते त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणे योग्य वाटत नाही. तुम्ही कारवाई करत नाही, असेही राऊत म्हणाले. लखीमपूर खिरी प्रकरणावरून राऊतांनी विरोधकांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. विरोधकांची एकजूट वारंवार सरकारला प्रश्न विचारत राहील. तुम्ही आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा. आज १२ खासदारांना निलंबित केले. पुढच्या सत्रात ५० करा, आम्हा सर्वांना निलंबित करा. मात्र, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणे बंद करणार नाही. तुमच्या मंत्रिमंडळात जे खुनी बसले आहेत, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

मी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आभार मानतो, की तुम्ही हा मुद्दा उठवला नसता, त्या दिवशी रात्री तिथे पोहोचले नसते, तर त्याच दिवशी रात्री पूर्ण हत्येचे प्रकरण गुंडाळले असते. त्या मुळे मी सर्व विरोधकांच्या कडून तुमचे आभार मानतो, असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT