नवी दिल्ली : आयएएस (IAS) अधिकारी कधी स्वयंपाक करताना पाहिला आहे का? असा दुर्मिळ क्षण खुद्द आयएएस अधिकाऱ्यानेच सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. कानपूरचे महापालिका आयुक्त राज शेखर (Raj Shekhar) हे पोहे बनवत असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. परंतु, त्यांनी बनवलेले पोहे नव्हे तर दुसऱ्याच कारणासाठी त्यांचे ट्विट व्हायरल झाले आहे. यावरुन शिवसेनेच्या (Shivsena) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Pryianka Chaturvedi) यांनी या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज शेखर यांनी सुटाबुटात पोहे बनवत असल्याचा फोटो थेट स्वयंपाकघरातून ट्विट केला. मला शुभेच्छा द्या. मी पाककलेत नशीब आमजावतोय. गृहमंत्र्यांचा मार्गदर्शनाखाली मी पोहे तयार करीत आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते. सुरवातीला त्यांचे यासाठी मोठ्या प्रमाणात कौतुक होऊ लागले. मात्र, काही नेटिझन्सही या फोटोतील मोठी चूक शोधली. यानंतर राज शेखर यांना ट्रोल करण्याचा अहमहिका सुरु झाली.
प्रियांका चतुर्वेदी यांना यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वयंपाकाचा गॅस स्वयंपाकासाठी परवडण्यापलिकडे गेला आहे, हा संदेश तुम्ही मोदी सरकारला दिला आहे. याबद्दल तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. गॅसशिवाय स्वयंपाक करता येतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. मोदी सरकावरील राग म्हणून तुम्ही गॅस न पेटवता स्वयंपाक करून सर्वसामान्यांचा रोष दाखवून दिला आहे.
याला कारण होते शेखर पोहे बनवत असलेल्या गॅसचा बर्नरच पेटलेला नव्हता. यामुळे शेखर यांची चांगलीच फजिती झाली आहे. शेखर यांना यावरून ट्रोल होऊ लागल्याने काही नेटिझन्स त्यांच्या मदतीला धावले. पोहे बनवून झाल्यानंतर गॅस बंद केला असेल, असा युक्तिवाद करण्यात आला. काहींनी शेखर यांनी ईयरफोन घातल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, ते कॅमेऱ्यासमोर हास्य करीत चमचा घेऊन उभे असल्याचेही काहींनी म्हटले होते.
सुटाबुटात पोहे बनवले हे ठीक आहे, पण गॅस पेटवायचा असतो, असे टोमणा काहींनी मारला आहे. असा फोटो ट्विट केल्याबद्दल काहींनी शेखर यांना दोष दिला. काहींनी त्यांची तुलना बिरबलाशी केली. त्यांनी बिरबलाच्या खिचडीशी शेखर यांच्या पोह्याची तुलना केली. एकंदर शेख यांच्या पोह्यांचे ट्विटने सोशल मीडियावर मोठी लढाईच सुरू झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.