Sanjay Raut, Sharad Pawar Sarkarnama
देश

Sanjay Raut On Sharad Pawar : मोदींशेजारी बसण्याआधीच संजय राऊतांनी पवारांना 'असे' अडकवले...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला काँग्रेसने टोकाचा विरोध केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या पुरस्कारावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेनेच्या साथीने मोदींना राजकारणात कडवा विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या पुरस्कारच्या कार्यक्रमात व्यासपिठावर बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला पवारांची भूमिका पटलेली नाही तर शिवसेनेला पचलेल्याचे दिसून येत नाही. (Latest Political News)

मोदी-पवारांच्या एकत्र येण्यावरून शिवसेनेने पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 'पवारांनी लोकांत संभ्रम निर्माण करू नये, अशी मोजक्या शब्दांत अपेक्षा मांडून खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पण पवारांना कोणी सल्ला देणार नसल्याचे सांगून राऊत थोडेसे सावधही झाले. परंतू, पवार हे मोदींशेजारी बसल्यास विरोधकांत वर्तुळात अस्थिरता पसरण्याची शक्यता आहे.

देशात एकीकडे इंडिया नावाखाली विरोधकांची मोट बांधण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आघाडीवर आहेत. मोदींच्या विरोधात पवारांकडे अश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात आहे. अशातच पुण्यात मात्र पवार यांच्याच हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विरोधी गटासह जनतेच्या मनात विरोधकांच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आपल्या कृतीतून पवारांनी जनतेच्या मानात संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

दिल्ली सरकारसंबंधीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला विरोध करण्यासाठी शरद पवारांनी मंगळवारी राज्यसभेत उपस्थित राहावे, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. पण शरद पवार मात्र टिळक पुरस्काराला हजेरी लावणार आहेत. पवारांनी कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या'इंडिया'मधील नेत्यांनी घेतली असली तरी ते कार्यक्रमाला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील. यानंतर ते ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत. पावणेबारा वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्विकारल्यानंतर शिवाजीनगर मैदानावर मोदींची सभा होणार आहे. तेथे त्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT