Sanjay Raut: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाला तुफान प्रतिसाद लाभला आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेला दिसतो आहे. तर दुसरीकडं सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार खासदार संजय राऊत यांनी मानले आहेत. संजय राऊतांनी केलेल्या खोचक ट्विटची सध्या चर्चा सुरु आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की, "सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश माय लॉर्ड सूर्यकांत जी. आजच्या देशातील महान आंदोलनाचं श्रेय हे केवळ याच व्यक्तीला दिलं जायला हवं. देशातील मेलेल तरुणांना पुन्हा जागृत केल्याबद्दल आभार, धन्यवाद!"
दरम्यान, दिल्लीत सध्या लाखोंच्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. संसदेच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर तुफान गर्दी आहे. या गर्दीला पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दिल्ली पोलिसांचे जत्थे सध्या रस्त्यावर आहेत. त्यांनी लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. तसंच अभिजीत दिपके यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं संध्याकाळपर्यंत या आंदोलनाचं काय होतं हे पाहावं लागणार आहे.
दुसरीकडं सरकारनं या आंदोलकांशी चर्चा पण केली. जेपी नड्डा यांनी अभिजीत दिपकेंच्या दोन सहकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चाही केली. पण अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. कारण दुसरीकडं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरु आहे. या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी आणि आणखी एका मंत्र्याचा समावेश आहे. त्यामुळं प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.