CJP March: संसदेच्या दारात मोर्चा दाखल! सरकार चर्चेला तयार, दिपकेंनी उपोषण घेतलं मागे; नेमक्या काय घडामोडी घडल्या?

CJP Protest Parliament: कोक्रोच जनता पार्टीच्यावतीनं जंतर-मंतरवरुन संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा संसदेच्या दारात पोहोचला आहे. यावेळी सरकारकडून आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आल्याचं कळतं आहे.
CJP leaders and protesters gather during the NEET protest at Jantar Mantar as the government agrees to hold discussions with JP Nadda.
CJP leaders and protesters gather during the NEET protest at Jantar Mantar as the government agrees to hold discussions with JP Nadda. Sarkarnama
Published on
Updated on

CJP March: कोक्रोच जनता पार्टीच्यावतीनं जंतर-मंतरवरुन संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा संसदेच्या दारात पोहोचला आहे. यावेळी सरकारकडून आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच सरकारनं चर्चेची तयारी दाखवल्यानं सोनम वांगचुक यांच्या विनंतीनुसार अभिजीत दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची देखील माहिती मिळते आहे.

सरकारकडून कोण? आंदोलकांकडून कोण? चर्चेला जाणार

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि अभिजीत दिपकेंचे सहकारी अशुतोष रांका आणि सौरव दास हे कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं भाजप नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. सकाळी सरकारच्यावतीनं चर्चेसाठी निमंत्रण आल्याचंही कॉक्रोच पार्टीनं सांगितलं आहे. तसंच आमची मागणी स्पष्ट आहे, मोठ्या प्रमाणावर तरुण आता या मोर्चामध्ये सामिल होत आहेत, अशी माहिती सीजेपीच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्यावतीनं जे पी नड्डा हे आंदोलक तरुणांसोबत चर्चा करणार आहेत.

अभिजीत दिपकेंचं उपोषण मागे

शनिवारी सरकारनं पहाटेच उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होतं. त्यानंतर त्याचक्षणी अभिजीत दिपके यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध करत आपण स्वतःच आता उपोषणाला बसलो आहोत अशी घोषणा केली. त्यानंतर दिपकेंच्या आजच्या उपोषणाचा दुसराच दिवस होता. रुग्णालयात वांगचुक यांनी दिपके यांना उपोषण संपवण्याचा संदेश दिला त्यानंतर दिपकेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

पोलिसाचा लाठीचार्ज

सीजपीचा निषेध मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. तसंच काही जणांना ताब्यातही घेतलं. सुरुवातीला डीएमआरसीकडून पाच मेट्रोल स्टेशन्स बंद करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव राजीव चौक, जनपथ, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय आणि सेवातीर्थ मेट्रो स्टेशनचा यात समावेश आहे. त्यामुळं या मेट्रो स्थानकांवर शेकडो प्रवाशी अडकून पडले आहेत. अनेकांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागलं. तसंच संसद परिसरात इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आलं आहे.

धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं भव्य स्वरुप प्राप्त केल्यानंतर तसंच आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचल्यानंतर दुसरीकडं ज्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमध्ये ते आपला राजीनामा सुपूर्द करतात का? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण अद्याप प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com