Sanjay Raut latest news twitter/@sanjayRaut
देश

राऊतांचे आक्रमक भाष्य; पत्रकार परिषदेतील बॉम्बसाठी पुरवला दारुगोळा

Sanjay Raut | Shivsena : भाजपचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी सकाळी मोठा गौप्यस्फोट केला. काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. आम्ही खूप सहन केले. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू, असा इशारा देत राऊतांनी मंगळवारी शिवसेना (Shiv Sena) भवनात याबाबत पर्दापाश करणार असल्याचे सांगितले आहे. या परिषदेला शिवसेनेचे राज्यभरातील आमदार, खासदार, पदाधिकारी झाडून येणार असल्याने प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

राऊतांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनीही तसे संकेत दिल्याने शिवसेनेच्या मनात नेमके चालले आहे, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी ही पत्रकार परिषद ऐकावी, असेही राऊत म्हणाले आहेत. एकूणच मंगळवारी शिवसेना भवनात अनेक बॉम्ब फुटणार आणि यातून (Shiv Sena Bhavan) नव्या संघर्षाची सुरूवात होणार संकेत राऊत व देसाईंनी आपल्या सूचक वक्तव्यांमधून दिले आहेत. भाजपचे (BJP) साडेतीन नेते कोण, याबाबतही पत्रकार परिषदेत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रचे (Maharashtra) लक्ष या परिषदेकडे लागले आहे.

दरम्यान याच पत्रकार परिषदेतील बॉम्बसाठी आज सकाळी सकाळी संजय राऊतांनी ट्विटवरुन दारुगोळा पुरवला आहे. संजय राऊत यांनी आक्रमक ट्विट करत भाजपच्या नेत्यांना इशारा आणि शिवसेनेच्या नेते-कार्यक्रत्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. ट्विटमध्ये संजय राऊत यांनी दिवंगत शायर राहत इंदोरी यांच्या शायरीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. यात "शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे" असे त्यांनी म्हंटले आहे. (Sanjay Raut Tweet)

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेही उपस्थित राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे इतर बडे नेते, आमदार, खासदार किल्ला लढवणार आहेत. याबाबत बोलताना देसाई म्हणाले, पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, खासदार सगळे जमणार आहेत. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही. तसेच जनतेसमोर, सरकारसमोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. लोकांना काय चाललंय ते कळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT