लखनो : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा (Assembly Election) दुसरा टप्पा पार पडला. मतदान यंत्रामध्ये गडबड केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. मतदानावेळी मतदाराने सायकल चिन्हाचे बटण दाबले. मात्र, त्यांना कमळाला मत दिल्याची स्लिप मिळत, असल्याची तक्रार समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे.
समाजवादी पक्षाने (SP) ट्विटरवरुन मुरादाबादमधील एका मतदाराचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सपाने कली आहे. सायकल चिन्हाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिल्याची स्लिप मतदारांना प्राप्त होत असल्याचा आरोप करणार एक व्हिडीओ सपाने ट्विट केला आहे.
मुरादाबाद ग्रामीण विधानसभा २७ बूथ क्रमांक ४१७ वर सायकल चिन्हा समोरील बटण दाबूनही कमळाला मतदान दिल्याची चिठ्ठी मतदारांना मिळाली. हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने माहिती घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सपाने ट्वीटवरुन केली आहे.
समाजवादी पक्षाने रामपूरमध्ये बूथ ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही केला होता. तसेच याआधी सहारनपूर जिल्ह्यातील बेहट विधानसभा मतदार संघाच्या बूथ क्रमांक १७० वर सायकल चिन्हा समोरील बटन दाबले तरी कमळाची स्लिप येत असल्याचा आरोप केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.