Sanjeev Khanna Sarkarnama
देश

Sanjiv Khanna Next CJI : चंद्रचूड यांचा 'उत्तराधिकारी' ठरला; देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

Supreme Court News : केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी (ता.24) याबाबतची घोषणा केली. त्यांनी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे दोन वर्षांच्या कारकीर्दीनंतर नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदासाठी संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते.

त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ते येत्या 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे.विशेष म्हणजे त्याच दिवशी डी.वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांचा कार्यकाळ संपणार आहे.

केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी(ता.24)याबाबतची घोषणा केली. त्यांनी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश संजीव खन्ना यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. धनंजय चंद्रचूड यांच्याप्रमाणेच संजीव खन्ना यांनीही त्यांच्या काळात काही ऐतिहासिक आणि तितकेच महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहेत.

भारताचे नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून सुमारे 40 अधिक वर्षांहून अधिक काळापासून ते न्याय क्षेत्रात कार्यरत आहेत.1983 साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्टनंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली.

2005 साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ते 2006 साली न्यायमूर्ती म्हणून कायम झाले.18 जानेवारी 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.न्या.संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

ते राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. जून ते डिसेंबर 2023 या काळात संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.

काही दिवसांपूर्वीच भूतानमध्ये एका कार्यक्रमात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी मोठं विधान केलं होतं. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते, मी दोन वर्ष देशाची सेवा केल्यानंतर यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारताचे सरन्यायाधीश पद सोडेल.

माझा कार्यकाळ संपतोय. त्यामुळं माझं मन भविष्य आणि भूतकाळातील शंका आणि चिंताबद्दल विचार करत आहे. मी अशा प्रश्नांवर विचार करतोय की,मी ते सगळं साध्य केलं आहे का, जे मी ठरवलं होतं? असा सवालही त्यांनी स्वत:लाच केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT