Aaditya Thackeray Wealth : आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल; जाणून घ्या, किती संपत्ती आहे नावावर?

Aaditya Thackeray Files Nomination From Worli : महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मतदारसंघांपैकी वरळी हा देखील एक मतदारसंघ आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray Nomination 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज(गुरुवार) वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी त्यांच्यासमेवर त्यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजेच वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मतदारसंघांपैकी वरळी हा देखील एक मतदारसंघ आहे.

या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने (MNS) आपले फायरब्रॅण्ड नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ज्यामध्ये त्यांच्या संपूर्ण संपत्तीचं विवरण आहे.

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार आदित्य ठाकरे यांच्यावर एक गुन्हा दाखल असून, चार्जशीट दाखल झालेलं नाही. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. तर संपत्तीचा विचार करायचा झाला तर आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा असून ज्याचं आताचं बाजार मूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहेत.

Aaditya Thackeray
Samarjit Ghatge: मुश्रीफांविरोधात 'वस्तादा'ने मोठा डाव टाकलाच; फडणवीसांच्या विश्वासू नेत्यालाच पवारांनी 'कागल'च्या आखाड्यात उतरवलं!

याशिवाय आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य 4 कोटी 56 लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे BMW चारचाकी वाहन, आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 07 हजार 159 रुपयांचे दागिने आहेत.

Aaditya Thackeray
Rajendra Mulak News : राजेंद्र मुळकांनी काँग्रेस नेत्यांसह गाठले 'मातोश्री' ; रामटेकमधून निवडणूक लढणार?

याचबरोबर आदित्य ठाकरेंकडे जंगम मालमत्ता - 15 कोटी 43 लाख 03 हजार 060 , अचल मालमत्ता - 6 कोटी 04 लाख 51 हजार 350 रुपये, बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये, बँक खात्यात फिक्स डिपॉसिट - 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये आहेत.

तसेच शेअर मार्केट गुंतवणूक - 70 हजार , म्युच्युअल फंड - 10 कोटी 13 लाख 78 हजार 052 रुपये, बॉण्ड्स - 50 हजार रुपये, एकूण गुंतवणूक (स्वतः) - 10 कोटी 14 लाख 98 हजार 052 रुपये, LIC पॉलिसी - 21 लाख 55 हजार 741 रुपये आहेत.

(Edidted by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com