Satish Kaushik Death : Vikas Malu
Satish Kaushik Death : Vikas Malu Sarkarnama
देश

Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण : मित्रावरच आरोप : पत्नीच्या पत्राने खळबळ!

सरकारनामा ब्यूरो

Satish Kaushik Death : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता विकास मालू (Vikas Malu) नावाच्या व्यक्तीचे नाव चर्चेत आहे. कौशिक यांच्यासोबतच्या नात्याबाबत मालू यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विकास मालू आणि सतीश कौशिक अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसून आले होते. आता विकास मालूच्या पत्नीने सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात आपल्या पतीवर कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. व्यवसायासाठी विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते,आणि हे पैसे परत करायला लागू नये, यासाठीच कौशिक यांना चुकीचे औषध पाजले, असा आरोप त्यांच्यावर होताना दिसत आहे.

विकास मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत. मालू यांचे वडील मूलचंद मालू यांनी 1985 मध्ये कुबेर खैनी यांच्यासोबत हा ग्रुप सुरू केला. 1993 मध्ये विकास मालू या ग्रुपचे संचालक झाले. कुबेर ग्रुपचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. कुबेर ग्रुप हे सर्व प्रकारचे पान मसाले, माउथ फ्रेशनर, सुगंध (धूप आणि धूप), खाण्यायोग्य आणि अखाद्य तेले इत्यादींच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू हे त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक स्टार्ससोबतचे फोटो आणि व्हिडिओ आहेत.

विकास मालूवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे :

विकास मालूचे वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त आहे. मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितले आहे की, बलात्कार केल्यानंतर त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आहे. मालूच्या पत्नीने पतीविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी देखील सुरू आहे. भारतात गुन्हा दाखल झाल्यापासून, विकास मालू हा अनेकदा दुबईत वास्तव्यास आहे. नुकतेच ते होळीच्या पार्टीसाठी दिल्लीत आले होते.

गुटखा किंगच्या पार्टीला सतीश आला होता :

अभिनेते सतीश कौशिक यांनी होळीच्या दिवशी (८ मार्च) मुंबईहून दिल्लीत दाखल झाले, विकास मालूच्या फार्महाऊसवर दुपारी आयोजित केलेल्या पार्टीला कौशिक यांनी हजेरी लावली होती. या पार्टीत गुटखा किंग विकास मालूसह अनेक बडे बिल्डर्सही उपस्थित होते. सतीश आणि विकास यांच्यात गेल्या 30 वर्षांपासून घट्ट मैत्री होती. दोघेही मित्र एकमेकांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. सतीश कौशिक आणि विकास मालू 30 वर्षांपासून मित्र होते.

छातीत दुखणे आणि मृत्यू :

रिपोर्टनुसार, अभिनेते सतीश कौशिक हे त्यांचे मित्र विकास मालूच्या घरी ए-5 पुष्पांजली येथे राहण्यासाठी थांबले होते. पार्टीच्या रात्री,कौशिक यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच कौशिक यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पत्रातून नवे वळण आले :

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालूच्या पत्नीने पोलिसांना एक पत्र दिले आहे. पत्रामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण दिले आहे. कारण सतीश कौशिक यांना चुकीचे औषध सेवन करण्यास दिले गेले, असा गंभीर आरोप महिलेने पती विकास मालूवर केले आहेत. तक्रारीनुसार, विकास आणि सतीश यांच्यात 15 कोटी रुपयांच्या कर्जावरून भांडण झाले होते. अशा स्थितीत महिलेने संशय व्यक्त करत विकास याने सतीश कौशिक यांना पैसे द्यावे लागू नयेत, म्हणून चुकीचे औषध पाजले असावे, असे सांगितले.

यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, सतीश कौशिक हे विकासला दिलेले पैसे गोळा करण्यासाठी गेले होते की, आले होते की केवळ होळीच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी? 15 कोटींचे कर्ज, सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्यातील व्यावसायिक संबंध आणि पत्नीचे आरोप याबाबत पोलीस आता नव्याने तपास करत आहेत.

विकास मालू काय म्हणाला?

विकास मालू हा दुबईत राहतो आणि होळीच्या पार्टीसाठी खास दिल्लीत आला होता. त्यांच्यावरील आरोप उपस्थित करण्यात आल्यानंतर मालू यांनी स्पष्टीकरण दिले की, "सतीशजी 30 वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा भाग होते. दुनियेला माझ्या नावाला चुकीच्या पद्धतीने पुढे आणण्यास एक मिनिटही लागत नाही.

संकटं काही सांगून आणि माझे नाव जगासमोर चुकीचे सांगण्यास एक मिनिटही लागला नाही. मला सांगायचे आहे की, संकट कधीच सांगून येत नाही आणि त्यावर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT