Satta Bazar Predictions  Sarkarnama
देश

Satta Bazar Prediction : टॉप टेन सट्टा बाजारात कुणाची हवा? लोकसभा निकालाच्या अंदाजाची पोस्ट व्हायरल

Lok sabha Election 2024 Result Top ten Satta Bazar Predictions : फलोदीसह सूरत, अहमदाबाद, कोलकाता अशा दहा प्रसिध्द सट्टा बाजारातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येऊ लागले आहेत.

Rajanand More

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल समोर येतील. पण त्याआधीच देशातील सट्टा बाजारातील अंदाज समोर येऊ लागले आहेत. देशातील टॉप टेन सट्टा बाजारातील कलाची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून लोकसभेत त्रिशंकू स्थिती असेल, अशी अंदाज बाजारात व्यक्त केला जात असल्याचे या पोस्टमधील आकड्यांवरून दिसते.

लोकसभा निकालाबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेली पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या नावाने प्रसिध्द करण्यात आली आहे. एक्सवरील काही व्हेरिफाईड अकाऊंटवरही ही पोस्ट आहे. त्यामध्ये महुआ मोइत्रा फन्स या एक्स हॅंडलचाही समावेश आहे.

संबंधित वृत्तवाहिनीकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. अशाप्रकारे कोणतेही बातमी दिली नसल्याचे या वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

बहुतेक सट्टा बाजारात एनडीए बहुमताचा आकडाही गाठू शकणार नाही, असा अंदाज आहे. प्रसिध्द फलोदी सट्टा बाजारात भाजपला 209 तर एनडीएला 253 जागा मिळतील, असा कल आहे. काँग्रेस 117 आणि इंडिया आघाडी 246 चा आकडा पार करेल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दहापैकी केवळ दोन सट्टा बाजारात एनडीएची सत्ता येईल, असा अंदाज आहे. इंदौर आणि अहमदाबाद सट्टा बाजारात हा कल असल्याचे व्हायरल पोस्टमधील आकड्यांवरून दिसते. इतर सर्व सट्टा बाजारात त्रिशंकू अंदाज वर्तवण्यात आल्याचे पोस्टमधील आकडे सांगतात.

Satta Bazar Predictions

इतर बाजरांतील आकडे असे...

सट्टा बाजार    भाजप   एनडीए  काँग्रेस  इंडिया

फलोदी         २०९    २५३    ११७    २४६

पालनपूर        २१६    २४७    ११२    २२५

करनाल        २३५    २६३    १०८    २३१

बोहरी          २२७    २५५    ११५    २१२

बेळगाव        २२३    २६५    १२०    २३०

कोलकाता       २१८    २६१    १२८    २२८

विजयवाडा      २२४    २५१    १२१    २३७

इंदौर          २६०    २८३    ९४     १८०

अहमदाबाद      २४१    २७०    १०४    १९३

सूरत          २४७    २८२    ९६     १८६

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT