Betting Market Predictions : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस जवळ येत चालला आहे. त्यानुसार देशभरातील सट्टा बाजारातही उलथापालथ होऊ लागली आहे. सातव्या टप्प्यातील मतदानापुर्वी अनेक सट्टा बाजारांनी भाजपचे टेन्शन वाढवले आहे.
राजस्थानमधील प्रसिध्द फलोदी सट्टा बाजारात देशात 'एनडीए'ची सत्ता येईल, असा कल असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याच राज्यातील गुजरातमधून मात्र धक्कादायक कल समोर येत आहेत.
गुजरातमधील सूरत सट्टा बाजार, बोहरी सट्टा बाजार आणि अहमदाबाद सट्टा बाजारातील सट्टेबाजांकडून भाजपला फारशी पसंती मिळताना दिसत नाही. सूरत बाजारातील कलानुसार, एनडीएला सत्ता मिळत असली तर केवळ 282 जागा पदरात पडू शकतात.
बोहरी आणि अहमदाबाद सट्टा बाजारातील भविष्यवाणी भाजपची चिंता वाढवणारी आहे. बोहरी सट्टा बाजारातील आकलनानुसार भाजपला 227 तर एनडीएला 255 जागा मिळतील, असे भाकित वर्तवले जात आहे. अहमदाबाद बाजारातील स्थितीही फारशी वेगळी नाही.
अहमदाबाद बाजारातही भाजप बहुमतापासून दूर राहणार असल्याचे दाखवले जात आहे. भाजपला केवळ 241 तर एनडीएला 270 जागांपर्यंत समाधान मानावे लागेल, असा या बाजारातील कल आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारात भाजप बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही, यानुसारच सट्टा लावला जात आहे.
काँग्रेससाठी खूषखबर
तिन्ही सट्टा बाजारांनी काँग्रेसला काहीसा दिलासा दिला आहे. सूरत सट्टा बाजारातील कलानुसार, काँग्रेसला 96, अहमदाबाद बाजारानुसार 104 तर बोहरी सट्टा बाजारानुसार काँग्रेसला 115 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.
एनडीएला बहुमत मिळत नसले तरी इंडिया आघाडीही बहुमतापासून दूरच असल्याचे तिन्ही सट्टा बाजारातील कलांनुसार दिसते. दरम्यान, फलोदी तसेच मुंबई सट्टा बाजारातून मात्र एनडीए पुन्हा 300 चा आकडा पार करून सत्तेत येईल, असा अंदाज समोर येत आहे. पण, एनडीएचे 400 पारचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.