Satya Nadella big Announcement : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी भारतात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटी दरम्यान मायक्रोसॉफ्टच्या सीईओनी भारतात कंपनी विस्तार आणि इन्वेस्टमेंट प्लॅनबाबत सविस्तर चर्चा केली.
प्रमुख मुद्य्यांमध्ये एआय, क्लाउड सर्विस पासून नवकल्पनांचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या या भेटीनंतर सत्या नडेला यांनी एक्स पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तर पंतप्रधान मोदींनीही एका पोस्टमध्ये या मुलाखतीत चर्चा झालेल्या मुद्य्यांबाबत सांगितले. याचसोबत मंगळवारी सत्या नडेला यांनी देशात 3 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही केली.
मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची(PM Modi) भेट घेत, भारतात कंपनीच्या गुंतवणूक योजना आणि एआयच्या अनेक मुद्य्यांवर चर्चा केली. त्यांनी भारताला AI सेक्टरमध्ये अग्रणी बनवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी उत्सुकता दर्शवली.
सत्या नडेला(Satya Nadella) यांनी एक्स अकाउंटवर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तुमच्या नेतृत्वासाठी धन्यवाद. आम्ही भारताला AI First बनवण्यासाठी आमची प्रतिबद्धता आणि देशात आमच्या सततच्या विस्तारावर मिळून काम करण्यासाठी उत्साही आहोत, जेणेकरून हे सुनिश्चित केलं जाऊ शकेल की या AI Platformच्या बदलाने प्रत्येक भारतीयाला लाभ मिळू शकेल.
पंतप्रधान मोदींनी सत्या नडेला यांच्या भेटीबाबत एक्स पोस्टवर शेअर करत म्हटले की, तुम्हाला भेटून आणि भारतात मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वकांक्षी विस्तार व गुंतवणूक योजनांबाबत जाणून घेऊन आनंद झाला. या बैठकीत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि एआयच्या विविध मुद्य्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मंगळवारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले की, मायक्रोसॉफ्ट वर्ष 2030 पर्यंत भारतात जवळपास 1 कोटी लोकांना एआय स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देईल. सत्या नडेला यांनी पुढे म्हटले की भारतात प्रचंड वेग आहे, जिथे लोक मल्टी एजंट प्रकारे नियुक्तीसाठी जोर देत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.