
Atishi out from CM House : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की, त्यांना जे मुख्यमंत्री निवासस्थान मिळाले आहे, त्याचे वाटप भाजप सरकारने रद्द केले आहे. आमचे घर हिसकावले जात आहे. निवडुकीची घोषणा होण्याच्या आदल्यादिवशी रात्री हे घडलं आहे. हे दुसऱ्यांदा आहे. जेव्हा मला शासकीय निवासस्थानतून बाहेर काढलं.
मुख्यमंत्री आतिशी(Atishi) यांनी म्हटले की, आज दिल्लीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. दिल्लीच्या निवडणुकीची घोषणा ज्या दिवशी झाली, त्याच्या आदल्या दिवशी रात्री भाजपच्या केंद्र सरकारने जे माझे शासकीय निवासस्थान आहे, जे मला मुख्यमंत्री झाल्यांतर मिळालं होतं, तीन महिन्यांत दुसऱ्यांदा मला मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर फेकलं.''
यापुढे त्यांनी म्हटले की, ''चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्रई निवासस्थानाचे वितरण रद्द केले. एका निवडून आलेल्या सरकारच्या निवडलेल्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री निवास्थान काढून घेतले गेले. तीन महिन्यांपूर्वीही त्यांनी हेच केले होते. जेव्हा मुख्यमंत्री बनले, निवासस्थानातून माझे आणि माझ्या परिवाराचे सामान काढून रस्त्यावर फेकले होते. भाजपला(AAP) वाटतं की घर हिसकावल्याने, आम्हाला शिव्या दिल्याने, माझ्या कुटुंबाबाबत खालच्या पातळीवरील टिप्पणी केल्याने आम्ही काम करणं थांबवू.''
मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर(BJP) निशाणा साधत म्हटले की, ते आमची घरी हिसकावून घेवू शकतात परंतु दिल्लीतील लोकांसाठी काम करण्याची आम्ची इच्छाशक्ती नाही हिसकावून घेऊ शकत. गरज पडली तर मी दिल्लीतील लोकांच्या घरात राहील. तुमच्या घरातून दिल्लीवाल्यांसाठी दुप्पट वेगाने काम करेन. आम्हाला कितीही त्रास द्या, आम्ही दिल्लीवासीयांची कामं थांबू देणार नाही.
तसेच आज जेव्हा मला मुख्यमंत्री निवासस्थानातून काढलं, तर आज मी शपथ घेत आहे की दिल्लीच्या प्रत्येक महिलेस 2100 रुपये मिळवून देईल. संजीवनी योजनेअंतर्गत प्रत्येक वयस्कर व्यक्तिला मोफत उपचार देईन. दिल्लीतील प्रत्येक पुजारी आणि ग्रंथींना दर महिन्यास 18 हजार रुपयांचा सन्मान निधी देवूनच राहील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.