Hajj flight fire in Lucknow  sarkarnama
देश

Saudi Arabian plane avoids accident : बालबाल बचावले 250 विमान प्रवाशांचे प्रमाण; लखनौऊ विमान तळावर थरार, लँडिंगवेळीच चाकातून आग अन् धूराचे लोट

Scare at Lucknow Airport : अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटना ताजी असतानाच लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदैवाने मोठी घटना टळली.

Aslam Shanedivan

Lucknow News : अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटना ताजी असतानाच लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदैवाने मोठी घटना टळली. सौदी अरेबियातून लखनौला येणाऱ्या 250 हज यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या विमानाच्या विमानाच्या डाव्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ठिणग्या पडत होत्या. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नाही. ही घटना आज सकाळी 6.30 वाजता घडली असून विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर टॅक्सीवेवर येत असताना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौदी अरेबियाहून लखनौसाठी सौदी अरेबिया एअरलाइन्सचे एसव्ही 3112 हे विमान रविवारी रात्री 10.45 वाजता निघाले होते. ते जेद्दाहहून निघाले होते, ज्यात 250 हज यात्री होते. पण सकाळी चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगवेळीच विमानाच्या चाकात तांत्रिक बिघाड झाला.

विमानाच्या चाकातून अचानक ठिणग्या आणि धूर निघू लागला. यावेळी लखनौ विमानतळावर एकच गोंधळ उडाला. तसेच धूर आणि ठिणग्या निघताना दिसताच वैमानिकाने तात्काळ सतर्कता दाखवत तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सूचना दिली होती.

ज्यानंतर विमानतळावरील अग्निशमन पथकाने अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. आग पसरू नये म्हणून फोम आणि पाण्याचा मारा करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. यानंतर 20 मिनिटांनी सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं. सुदैवाने, या ठिणग्यांनी आगीचे रूप घेतले नाही. अग्निशमन पथकाने योग्य दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आता विमानाच्या चाकातील तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे लखनौ विमानतळ प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितलं असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याचेही विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे.

दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटना अद्याप ताजी असून दुसरी अशीच घटना टळल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अहमदाबाद दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ज्यात 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगालचे होते. फक्त एकच प्रवाशी या अपघातातून वाचला ज्याचे नाव विश्वास कुमार रमेश आहे. याच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT