Mallikarjun Kharge Sansad Bhavan :  Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge Sansad Bhavan : काहीही म्हणा आम्ही आहोतच 'इंडिया'...; मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली 'भाजप'ची फिरकी

अनुराधा धावडे

New Delhi : जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक आठवणींना उजाळा दिला. शहीद भगत सिंग यांनी संसद भवनात बॉम्ब फोडण्यापासून ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांंपर्यंत अनेक घटनांवर भाष्य करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाषण केलं.

'संसदेचा ७५ वर्षांचा प्रवास' यावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. सभागृहनेते पीयूष गोयल यांच्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले म्हणणे मांडले. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना मंत्रिपदे दिली होती. पण हे आज होऊ शकते का? असा सवाल खर्गेंनी उपस्थित केला. नेहरू टीकाकारांचेही म्हणणे ऐकून घेत होते. पण इथे पंतप्रधान आतही येऊ देत नाहीत. मंत्री पीयूष गोयलजी यांनाही थोडा आराम मिळाला पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

सत्ताधारी पक्षावर तोंडसुख घेत खर्गे म्हणाले, 'संविधान सभेच्या प्रयत्नांमुळेच हा देश जिवंत, एकसंध आणि सर्वसमावेशक आहे. सर्वसमावेशक म्हणाल तर थोडी भीती वाटेल...' I.N.D.I.A. लहान आहे. आमचे जे.पी. नड्डा साहेब त्याला 'इंडी' म्हणतात. म्हणूनच आम्ही म्हणतो, नाव बदलून काही होत नाही. इंडी म्हणा किंवा काहीही म्हणा, आम्ही आहोत भारत. तुम्ही काहीही म्हणा.

विशेष म्हणजे या वेळी त्यांनी 'बदलना है तो अब हालात बदलो ऐसे नाम बदलने से क्या होता है?' एका कवितेतून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. इतकेच नव्हे तर आपल्या कवितेतून त्यांनी काही करू शकत नसाल तर खुर्ची सोडा, असा थेट इशाराही दिला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT