Mathadi Kamgar 
देश

Exams Fraud: राज्यात परीक्षांमधील घोटाळे सुरुच! आता माथाडी कामगार निरीक्षकपदाची परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात; निवड प्रक्रियेत झाला फेरफार

या पदासाठी लावलेल्या मेरिटमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे.

Amit Ujagare

Exams Fraud: महाराष्ट्रात परीक्षांमधील घोटाळ्यांचं सत्र अजूनही सुरुच आहे. यापूर्वी टीईटी, नीट आणि एमपीएससीचे पेपर लीक झाल्यानंतर आता माथाडी कामगार निरीक्षकपदाची परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या पदासाठी लावलेल्या मेरिटमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे. ही परीक्षा 62 जागांसाठी राज्यातल्या पुणे नागपूर संभाजीनगर अशा वेगवेगळ्या केंद्रावर घेण्यात आली होती.

परीक्षेतील आक्षेप काय?

माथाडी कामगार निरीक्षकपदासाठी राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली होती. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे पुणे परीक्षा केंद्रावर होते मात्र सर्वाधिक टॉपर विद्यार्थी नागपूर केंद्रातून निवडले गेले आहेत. नागपूर केंद्रातून ६२ पैकी २४ विद्यार्थी निवडले गेले. ज्या २४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांचे इतर वेगवेगळ्या परीक्षांमधील जर परफॉर्मन्स बघितले तर ते ५० टक्क्यांपेक्षा खूप खाली आहेत, काही विद्यार्थ्यांना तर २ आणि ४ गुण आहेत.

भलतेच प्रश्न, अधिकृत निकाल नाही

दरम्यान, या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे ५२ कायदे सांगितले होते, त्यावर प्रश्न न विचारता इतर दोन कायद्यांवर २४ प्रश्न विचारले गेले. २४ प्रश्न म्हणजे तब्बल ४८ गुणांसाठी म्हणजे हा सर्वात मोठा स्कोअर आहे. ही परीक्षा TCS या कंपनीनं घेतली होती तसंच याचा निकालही याच संस्थेनं अधिकृतपणे जाहीर करणे अपेक्षित होतं. मात्र या परीक्षेच्या निकालाचे व्हायरल झालेले स्क्रीनशॉट हे निधी चांदुरकर या खाजगी व्यक्तीनं जाहीर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षेला 'रॉ स्कोअर' दाखवला जातो आणि नंतर नॉर्मलायझेशन होतं मात्र, या परीक्षेमध्ये 'रॉ स्कोअर' अजिबात प्रसिद्ध केला गेला नाही.

पडताळणीची मागणी

परीक्षा केंद्रापासून तिथल्या सुविधांचा आढावा घेतलानंतर निकालाची प्रत ज्या Excel शिट वरुन भरला गेला असून त्यात एडिट करण्यात आल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळं परीक्षा केंद्रावरील फॉरेन्सिक ऑडिट, संगणक नोड्स व आयपी लॉग्स, सर्व्हर लॉग्ज, सुरक्षा फोटो यांची पडताळणी करा अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT