Recruitment exam malpractice : नामांकित शिक्षणसंस्थेतील शिक्षकेत्तर भरती परीक्षेत गैरप्रकार; विमानतळावर आवळल्या दोघांच्या मुसक्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त

IIT Goa recruitment exam, IIT Goa exam malpractice, CISF Goa airport, cheating in recruitment exam : आयआयटी गोवा येथील शिक्षकेत्तर भरती परीक्षेसाठीच्या, प्रशासकीय सहाय्यक पदाचे प्रवेशपत्रही जप्त करण्यात आले. हे उपकरण त्या परीक्षेत वापरण्यासाठीच होते, अशी कबुली त्या दुसऱ्या प्रवाशानेही दिली.
CISF personnel detained two passengers at Goa airport after allegedly finding electronic devices, SIM cards and Bluetooth earpieces linked to suspected malpractice in the IIT Goa recruitment examination.
CISF personnel detained two passengers at Goa airport after allegedly finding electronic devices, SIM cards and Bluetooth earpieces linked to suspected malpractice in the IIT Goa recruitment examination.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Goa airport news : मागील काही महिन्यांपासून देशात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून रान उठले होते. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर झालेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता प्रसिध्द आयआयटी संस्थेच्या भरती परीक्षेतील गैरप्रकाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी रविवारी गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केल्यानंतर परीक्षांमध्ये गैरप्रकार किंवा कॉपी करण्यासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आली आहेत. त्यांनी IIT गोवामध्ये झालेल्या भरती परीक्षेसाठी या उपकरणांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'पीआयबी'ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1340 या विमानाने गोव्याहून दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाने उड्डाण पूर्व सुरक्षा तपासणी केंद्रावर त्याची हँडबॅग एक्स रे स्क्रिनिंगसाठी ठेवली होती. यावेळी CISFच्या कर्मचाऱ्याला एक्स रे प्रतिमेत संशयास्पद वस्तू आढळल्या.

CISF personnel detained two passengers at Goa airport after allegedly finding electronic devices, SIM cards and Bluetooth earpieces linked to suspected malpractice in the IIT Goa recruitment examination.
Rahul Gandhi news : राहुल गांधींचा पहिल्यांदाच सर्वात मोठा दावा; ज्ञानेश कुमारांचे आपल्याला मेसेज, मोदी सरकारमधील 200 अधिकारी...

कर्मचाऱ्याची ती बॅग प्रत्यक्ष तपासणीसाठी पाठवली. या तपासणी दरम्यान स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन सिम कार्ड आणि तीन ब्लूटूथ इअरपीस हस्तगत करण्यात आले. अधिक चौकशी केल्यानंतर ही उपकरणे परीक्षेत गैरव्यवहारासाठीच असल्याचे पहिल्या प्रवाशाने मान्य केले. तसेच आपल्यासोबत प्रवास करणारा सहकारी आधीच विमानात बसल्याची माहिती त्याने दिली.

विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवले. त्याच्या हँडबॅगच्या झडतीदरम्यान तशाच प्रकारचे एक साधन, दोन ब्लूटूथ इअरपीस, एक सिम कार्ड जप्त करण्यात आले. तसेच त्याच दिवशी पार पडलेल्या आयआयटी गोवा येथील शिक्षकेत्तर भरती परीक्षेसाठीच्या, प्रशासकीय सहाय्यक पदाचे प्रवेशपत्रही जप्त करण्यात आले. हे उपकरण त्या परीक्षेत वापरण्यासाठीच होते, अशी कबुली त्या दुसऱ्या प्रवाशानेही दिली.

CISF personnel detained two passengers at Goa airport after allegedly finding electronic devices, SIM cards and Bluetooth earpieces linked to suspected malpractice in the IIT Goa recruitment examination.
BJP government news : अत्याचाराचा कळस, मुलांच्या किंकाळ्या..! भाजपच्या राज्यातील हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून केंद्रीय मंत्रीच हतबल

पहिल्या प्रवाशाने, तो इतर दुसऱ्याच उमेदवाराच्या ऐवजी या परीक्षेला बसला असल्याची कबुली दिली. या प्रवाशाने सुरक्षा क्षेत्रात त्याने फेकून दिलेले इतर दोन व्यक्तींचे आधार कार्डही यानंतर जप्त करण्यात आले. दोन्ही प्रवाशांसह, जप्त केलेली सर्व उपकरणे आणि कागदपत्रे दाबोलीम विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संबंधित परीक्षा केंद्र हे फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, नंतर त्यांना तिथे हस्तांतरित करण्यात आले. दोन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com