India vs Pakistan  Sarkarnama
देश

India vs Pakistan: पाकिस्तानच्या चिंधड्या उडाल्या ते 'ऑपरेशन सिंदूर' नंतरचे 'सीड ऑपरेशन' काय आहे?

Indian Army Seed Operation: जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना (एसएमएम) नष्ट करणे हा या सीड ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट असते. हा धोका संपल्यावर शत्रुच्या प्रदेशात सैन्याला सहजपणे प्रवेश करता येतो.

Mangesh Mahale

Ind vs Pak War:भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टमवर हल्ला करीत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवून दिल्या आहे. गुरुवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 45 मिसाईल आणि 60 ड्रोन पाडले आहे. लष्कराच्या भाषेत त्याला सीड ऑपरेशन (Seed Operation) म्हणतात. सीड ऑपरेशन म्हणजे काय, याचा उपयोग सर्वात पहिले कोणी केला होता, हे जाणून घेऊयात.

शत्रुचे रडार आणि एअर डिफेन्स सिस्टमला खराब करणे, याला सीड ऑपरेशन म्हणतात, त्यामुळे भारताचे लडाऊ विमाने पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला करु शकतात. शत्रुची एअर डिफेन्स सिस्टम नेस्तानाबूत केल्यानंतर त्या देशावर हल्ला करण्यात येतो. अनेक वेळा याला डेड (डीईएडी) असेही संबोधले जाते. याचा अर्थ शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करणे होय अमेरिकेला सीड ऑपरेशनता चांगला अनुभव आहे.

काल पाकिस्ताननं भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या एच क्यू -9 या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्धवस्त केलं. यानंतर देखील पाकिस्ताननं भारतावर ड्रोन, मिसाईल आणि हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं. दोन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमला उद्धवस्त करणारे भारताचे सीड ऑपरेशन काय हे जाणून घेऊयात

मिसाईल हल्लांपासून संरक्षण हा सीड ऑपरेशनचा मुख्य उद्देश असतो. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना (एसएमएम) नष्ट करणे हा या सीड ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट असते. हा धोका संपल्यावर शत्रुच्या प्रदेशात सैन्याला सहजपणे प्रवेश करता येतो. लढाऊ विमाने शत्रूच्या हद्दीत सहज प्रवेश करून इच्छित ठिकाणी हल्ला करता येतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हवाई दलाने लढाऊ विमानांद्वारे शत्रूचे हवाई संरक्षण शोधून नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. युद्धादरम्यान रडार, दळणवळण, कमांड सेंटर आणि हवाई संरक्षण एकाच वेळी नष्ट करण्यात यश मिळाल्यानंतर ब्रिटनने जर्मनीची पराभूत करण्याची रणनीती आखली होती. यात ब्रिटनला यश मिळाले होते.

व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकन हवाई दलाने सीड ऑपरेशन राबवले होते. व्हिएतनामी सैन्याने रशियात बनवलेल्या एसए-२ गाइडलाइन क्षेपणास्त्रावर आधारित प्रभावी हवाई संरक्षण प्रणालीमुळे अमेरिकन हवाई दलाने धोका दूर करण्यासाठी विविध प्रकारची नवी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्धउपकरणांचा वापर केला होता.

हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्याची क्षमता

व्हिएतनाम युद्धानंतरच्या काळात प्रगत रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्रे, विशेष इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे आणि सीड ऑपरेशनसाठी नवीन हवाई डावपेचांचा विकास आणि वापर करण्यात आला.

जमिनीवरून हवेत मारा

लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करून सीड ऑपरेशन भारताने राबवले.या ऑपरेशनसाठी सामान्यत: हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्रांची आवश्यकता असते. ही क्षेपणास्त्रे रडारसिग्नल उचलतात आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी शत्रूची क्षेपणास्त्रे तैनात असलेल्या ठिकाणांवर हल्ला करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT