Operation Sindoor: कुणाच्या शवपेटीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुख, राष्ट्रपतींनी अश्रू ढाळले; मारला गेलेला दहशतवादी मसूद, हाफिज की दुसरा कोण?

Pakistan Army Chief Terrorist Funeral: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद, हाफिज की आणखी कुणी मोठा अतिरेकी मारला गेला की त्यावर लष्करप्रमुख आणि राष्ट्रपतींनी अश्रू ढाळले, कुणाच्या शवपेटीवर त्यांनी फुलं अर्पण केली, हा अतिरेकी कोणत्या संघटनेचा प्रमुख होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Hafiz Saeed funeral rumors | operation sindoor
Hafiz Saeed funeral rumors | operation sindoorSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor India News Live Updates: भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचा मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे, त्याच्या मृत्यूवर पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अश्रू ढाळले आहेत.

मोठ्या दहशतवाद्याच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी फुलांचा हार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. ही घटना आश्चर्यचकीत करणारी आहे. या घटनेने पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. यात मसूद, हाफिज की आणखी कुणी मोठा अतिरेकी मारला गेला की त्यावर लष्करप्रमुख आणि राष्ट्रपतींनी अश्रू ढाळले. कुणाच्या शवपेटीवर त्यांनी फुलं अर्पण केली, हा अतिरेकी कोणत्या संघटनेचा प्रमुख होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडे मिळून अशा नऊ ठिकाणी 14 क्षेपणास्त्र डागण्यात आली, यात 90 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे केवळ लष्करी प्रत्युत्तर नव्हते तर ते भारताच्या दृढ हेतूचे दर्शन घडवणारे पाऊल होते. रिपोर्टनुसार 24 अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे भारताने दहशतवाद्यांना धडका शिकवला आहे. तसेच दहशतवाद किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांना सहन करणार नाही, असा इशाराही भारताने दिला आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्वत: अझहरने दिली आहे. “मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं,” असे त्याने म्हटले आहे.

"रात्रीच्या हल्ल्यात माझ्या कुटुंबातील 14 सदस्यांच्या मृत्यू झाला. यात माझी मोठी बहीण आणि तिचा पती मारले गेले, पाच मुले मारली गेली, माझा पुतण्या आणि पुतण्याची पत्नी मारली गेली, माझी प्रिय भाची मारली गेली, हुजैफा आणि त्याची आई मारली गेली आणि माझ्या दोन प्रिय साथीदारांसह एकूण 14लोक मारले गेले," असे अझहरने म्हटले आहे. या हल्ल्यानंतर त्याची अवस्था अशी झाली की तो म्हणू लागला की मीही मेलो असतो तर बरे झाले असतं.

Hafiz Saeed funeral rumors | operation sindoor
Operation Sindoor India :पाकिस्तानात एअर स्ट्राईक कसा झाला? कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला? ऑपरेशन सिंदूरचे महत्वाचे मुद्दे

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याबद्दल पाकिस्तान आकडेवारी सतत बदलत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पाकिस्तानला उद्देशून केलेल्या भाषणात 26 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले अशी कबुली दिली आहे. भारताला याचा किंमत मोजावी लागेल, असा इशाराच शरीफ यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com