New Parliament Live : Sarkarnama
देश

New Parliament Live : पंडित नेहरूंचा स्पर्श झालेला 'सेंगॉल' आपल्यासाठी प्रेरणा; नव्या संसद भवनात मोदींचे पहिले भाषण...

Chetan Zadpe

New Delhi : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय संसद सदस्यांनी नव्या संसद भवनात प्रवेश केला. मोदी यांनी नव्या संसद इमारतीत सभागृहाला संबोधित केले आहे. नवीन संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या वेळी मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारताला मोठ्या कॅनव्हासवर काम करावे लागेल. जे काही कायदे केले जातील आणि संसदेतील सर्व चर्चा हे भारतीय आकांक्षांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असले पाहिजेत. आपण आपल्या विचारांची कक्षा वाढवूया, तरच भारताचं विकसित चित्र आपल्याला काढता येईल."

मोदी पुढे म्हणाले, "इथे स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचे साक्ष देणारे, जे येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देईल, असा सेंगाल आहे. हे तेच सेंगाल आहे, त्या सेंगालला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा स्पर्श झाला आहे. नेहरूंच्या हस्ते याची पूजाविधी करून स्वातंत्र्याच्या पर्वाची सुरुवात झाली होती. तामिळनाडू महत्त्वाच्या परंपरेचे ते प्रतीक आहेच, देशाच्या एकतेचंही ते प्रतीक आहे. पंडित नेहरूंच्या हाती असलेलं हे सेंगाल आपल्याला प्रेरणा देत आहे.

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नवीन संसद भवनाची भव्यता आमच्या आधुनिक कामगिरीचे प्रतिबिंब आहे. आमच्या श्रमिकांनीही कोरोनामध्ये काम केले. अशा काळातही त्यांनी एक मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. आपण सर्वजण आपल्या मजूर आणि कामगार, अभियंत्यांचे मनापासून आभार मानूया. यामध्ये अनेकांनी परिश्रम घेतले आहेत."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT