Women Reservation Bill : मोदी सरकारचा मोठा निर्णय! महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

Parliament Special Session : मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय; लोकसभा-विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार ?
PM Narendra Modi and Amit Shah
PM Narendra Modi and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असून, १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच सोमवारी झालेल्या मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा आणि विधानसभेत आता महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संसदेच्या पाच दिवसांच्या या विशेष अधिवेशनात आता लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या २० किंवा २१ सप्टेंबरला महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष सत्रात मांडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदी सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

PM Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi Vs Congress : केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय होणार; मोदी सरकार विरोधकांना धक्का देणार?

विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विशेष अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा झाली असून, याचवेळी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. या महिला आरक्षणाच्या विधेयकाची मागणी विरोधकांकडूनदेखील करण्यात आली होती.

दरम्यान, मोदी सरकार संसदेच्या या विशेष अधिवेशनात अजून कोणते मोठे निर्णय घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागले असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विधेयक सादर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले तरी मोदी सरकार कोणकोणते विधेयकं संसदेत मांडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

PM Narendra Modi and Amit Shah
Ajit Pawar Vs Rohit Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची जोरदार एन्ट्री; पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात अनेकांची घरवापसी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com