देश

ज्येष्ठ नागरिकाने स्टेजवर येऊन थेट भाजप आमदाराच्या कानाखाली लगावली

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी भाजपकडून (BJP)निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. पण आता पक्षाच्या आमदारालाच एका ज्येष्ठ नागरिकाने स्टेजवर येऊन थोबाडीत मारल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. हा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भाजपचे आमदार पंकज गुप्ता (Pankaj Gupta) यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. गुप्ता हे एका पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्टेजवर एक ज्येष्ठ नागरिक आला आणि त्याने थेट गुप्तांच्या थोबाडीत लगावली. हे पाहून भाजप कार्यकर्ते धावत आले आणि त्या ज्येष्ठ नागरिकाला पकडले. त्यांनी त्याला याबद्दल विचारणा केली. नंतर ते त्याला स्टेजवरून खाली घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरूअसल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी ३.३० वाजता मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे निवडणुकांच्या तारखांची घोषणा करतील.

यावर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परंतु, आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे ठरवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT