निवडणुकीआधी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपनं टाकला डाव!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे.
Charanjit Singh Channi and Narendra Modi 
Charanjit Singh Channi and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदींनी या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. आता काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी मोदींसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्यानेच त्यांनी दौरा रद्द करून परत जाणे पसंत केले, असे म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, पंजाब आणि पंजाबियत यांना बदनाम करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. राज्यातील वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न आहे. याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे. आम्ही पंजाबी हे राष्ट्रवादी आहोत. देशासाठी अनेक लढाया लढलो असून जिवाची बाजी लावली आहे. पंतप्रधानांसाठी छातीवर गोळी झेलणारा मी पहिला असेन. आणखी मी काय करायला हवे? मी आता माझे मनगट कापून दाखवू का?

Charanjit Singh Channi and Narendra Modi 
राजकीय नेत्यांना कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले; दानवेंपाठोपाठ महाजनही पॉझिटिव्ह

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून 5 डिसेंबरला विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

Charanjit Singh Channi and Narendra Modi 
वानखेडे प्रकरणात मुंबई पोलीस अडचणीत; पोलीस आयुक्त नगराळेंना समन्स

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाला होता. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com