IPS Praveen Sood
IPS Praveen Sood Sarkarnama
देश

IPS Praveen Sood New CBI Director : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

IPS Praveen Sood Appointed As CBI Director : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांची ही नियुक्ती दोन वर्षासाठी असणार आहे.

सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांचा कार्यकाळ 25 मेला संपणार आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकचे पोलिस महासंचालक सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीची दि. 13 (शनिवार) रात्री बैठक झाली.

त्यामध्ये सीबीआयच्या संचालकपदासाठी 3 वरिष्ट आयपीएस अधिकार्‍यांच्या नावांवर विचार करण्यात आला. त्यामध्ये अखेर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सूद हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

बैठकीत कर्नाटक, दिल्ली आणि इतर राज्यांतील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा झाली होती. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांचा दोन वर्षांचा निश्चित कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जयस्वाल यांची 26 मे 2021 रोजी सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, CBI संचालकाची निवड दोन वर्षासाठी केली जाते. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे निवड केली जाते. दोन वर्षासाठी नियुक्ती असली तरी समिता संचालकांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढवू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT