New Delhi News : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे हे गेल्या काही दिवसापूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानाने चांगलेच चर्चेत आले आहेत. खासदार दुबे यांनी काही दिवसापूर्वीच हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे या बंधू संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी 'पटक पटक के मारेंगे', असे वक्तव्य केल्याने चर्चेत आलेल्या निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. ‘जर नरेंद्र मोदी भाजपचे नेते नसतील तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष हा 150 जागाही जिंकू शकणार नाही’, असे वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केले आणि पुन्हा त्यांची चर्चा रंगली आहे.
झारखंडमधील गोड्डा मतदारसंघातील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. त्यावेळी दुबे यांनी हे वक्तव्य केले आहे. तर यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भाजपला पंतप्रधान मोदींची गरज आहे, मोदींना भाजपची नाही. इतकेच नाहीतर पुढील 15-20 वर्षे मोदी पक्षाचे केंद्रीय नेते आणि मुख्य चेहरा राहतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपमध्ये (BJP) पदावर असलेल्यांनी वयाची 75 वर्ष पार केल्यानंतर निवृत्त व्हावे, हा अलिखित संकेत 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा तयार झाला. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना सेवानिवृत्त व्हावे लागले होते. त्यामुळे हा निवृतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दुसरीकडे त्यावेळी 75 च्या उंबरठ्यावर पोहोचून तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ, अशी कल्पनाही त्यावेळी पीएम मोदींच्या मनात आली नसणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या येत्या 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही जणांना वाटत आहे. गेल्या काही दिवसापासून पीएम मोदी यांच्या निवृत्तीवरून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार दुबे यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.