Padalkar Awhad Clash : पडळकरांच्या समर्थकाने आव्हाडांच्या लेकीला खालच्या भाषेत ट्रोल केलं, नताशाने 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत व्यक्त केला संताप

Natasha Awhad Tweet : जसा राजा, तशी प्रजा! देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस, तुम्ही मजा पाहत रहा फक्त, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने संताप व्यक्त केला आहे.
Natasha Awhad, daughter of Jitendra Awhad
Natasha Awhad, daughter of Jitendra Awhad, shared a screenshot of an abusive social media post, calling out Mumbai Police over inaction on cyber abuse.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 Jul : जसा राजा, तशी प्रजा! देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस, तुम्ही मजा पाहत रहा फक्त, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने संताप व्यक्त केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांची विधानभवनाच्या आवारात हाणामारी झाली. मात्र, ही हाणामारी होण्याला दोन्ही नेत्यांनी मागील काही दिवसांमध्ये एकमेकांवर केलेल्या टिका टिप्पणी कारणीभूत आहेत.

मागील आठवड्यात विधानभवनाच्या आवारात सर्व पत्रकारांसमोर जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना उद्देशून 'मंगळसूत्र चोर' म्हटलं होतं. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते.

Natasha Awhad, daughter of Jitendra Awhad
Maharashtra politics : फडणवीसांच्या नाकासमोर दंगल झाली...; पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

त्यानंतर पडळकरांनी आव्हाडांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याच सर्व प्रकरणावरून अखेर दोघांचे कार्यकर्ते विधीमंडळाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे.

Natasha Awhad, daughter of Jitendra Awhad
Rahul Narwekar Action: पडळकर-आव्हाडांचे समर्थकांमध्ये राडा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'फौजदारी...'

मात्र, अशातच एका व्यक्तीने जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशाच्या संदर्भात अश्लील टिप्पणी करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टचा स्क्रीनशॉट नताशाने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यावेळी तिने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत तुम्ही फक्त मजा पाहत रहा, असं लिहित नताशाने आपला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

ट्विटमध्ये नताशाने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, "जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस तुम्ही मजा पाहत राहा फक्त!", अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या पोस्टवर मुंबई पोलीस आणि गृहमंत्री फडणवीस काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com