Serbia Election  sarkarnama
देश

Serbia Election : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्तांतर, १४ वर्षांची 'वुचिचशाही' धुळीस; सर्बियात सत्ताबदल

Serbia Student Movement Aleksandar Vucic: अलेक्झांडर वुचिच यांच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत करत विद्यार्थी आघाडीचा ऐतिहासिक विजय सर्बियाच्या निवडणुकीत झाला आहे.

Roshan More

Aleksandar Vucic Defeat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने तब्बल १५ वर्षांची सत्तेत बदल झालेला आहे. सर्बियाची निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून देशावर सलग १४ ते १५ वर्षे एकछत्री अंमल गाजवणारे हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते अलेक्झांडर वुचिच आणि त्यांच्या 'सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी'चा दारूण पराभवाचा झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सामान्य नागरिक, प्राध्यापक आणि विशेषतः तरुणाईच्या नेतृत्वाखालील 'विद्यार्थी आघाडी'ने विक्रमी विजय मिळवत सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारविरोधात मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते. या आंदोलनाची सुरुवात नोव्हेंबर २०२४ मधील एका रेल्वे स्थानकातील छत कोसळल्याच्या दुर्घटनेने झाली. या दुर्घटनेत १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. सरकारी भ्रष्टाचार, अनास्था आणि कंत्राटदारांचा बेजबाबदारपणा यामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप करत सर्बियातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

सुरवातीला ही आंदोलन विद्यापीठ, महाविद्यालयांध्ये झाली, मात्र नंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. पारंपरिक राजकारणाला आणि हुकूमशाहीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ रस्त्यावर आंदोलन न करता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोणत्याही एका मोठ्या नेत्याचा चेहरा किंवा राजकीय पक्षाचा वरदहस्त नसताना, विद्यार्थ्यांनी 'स्टुडंट लिस्ट' नावाची आघाडी स्थापन केली.

या आघाडीत तरुण, बुद्धिजीवी, प्राध्यापक आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र आले. या निवडणुकीत तब्बल ७०% च्या आसपास विक्रमी मतदान झाले, जे सन २००० नंतरचे सर्बियातील सर्वाधिक मतदान ठरले. बदलाच्या तीव्र इच्छेने पेटलेल्या मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचले.

वुचिच यांचा डाव फसला

पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेने आणि राजकीय चाल म्हणून अलेक्झांडर वुचिच यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देऊन या मध्यावधी निवडणुका घडवून आणल्या होत्या. परंतु, जनतेच्या रोषासमोर त्यांचा हा डाव फेल ठरला. अखेर वुचिच यांना आपला पराभव अधिकृतपणे स्वीकारावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT