Ashok Chavan Congress return : अशोक चव्हाणांच्या काँग्रेस घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध? नाना पटोले म्हणाले...

Nana Patole reacts speculation over Ashok Chavan possible return Congress, citing resentment among Maharashtra Congress workers : काँग्रेस सोडलेल्या पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या घरवापसीची चर्चा; अशोक चव्हाणांच्या नावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता
Nana Patole on Ashok Chavan
Nana Patole on Ashok ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nana Patole on Ashok Chavan : काँग्रेस सोडून गेलेले देशातील पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा पक्षात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश असल्याने राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी सूचक विधान केले आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस संकटात असताना पक्षाची साथ सोडल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेईल, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची चर्चा सुरू असलेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे अशोक चव्हाण (Ashok Chavan), पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंह, जम्मू-काश्मीरचे गुलाम नबी आझाद, गुजरातचे शंकरसिंह वाघेला आणि आंध्र प्रदेशचे किरण कुमार रेड्डी यांच्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांच्या संभाव्य घरवापसीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना, महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या (Congress) अडचणीच्या काळात अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याचेही दिसून आले आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चेवर काँग्रेसमधील प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरत आहेत.

Nana Patole on Ashok Chavan
Donald Trump India Pakistan Conflict Claim : भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा; नोबेल पुरस्कारावरून खंत

पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसमधील संभाव्य घरवापसीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, "देशातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांना त्याचा अंदाज येऊ लागला आहे. त्यामुळे अनेक नेते आता काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास उत्सुक आहेत. वरच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. अनेक बदल होताना दिसतील."

Nana Patole on Ashok Chavan
Sonia Gandhi Rajiv Gandhi love story : राजीव गांधींचा मृदू स्वभाव जिंकून गेला मन; सोनिया गांधींच्या पुस्तकातून उलगडणार प्रेमकहाणी

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेबाबत पटोले यांनी राज्यातील कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "अशोक चव्हाण यांनी काँग्रेस संकटात असतानाच पक्षाची साथ सोडली. राहुल गांधी यांची देशात यात्रा सुरू होती आणि लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी राग आहे. हायकमांड काय निर्णय घेते, याकडे आमचे लक्ष आहे. ज्यावेळी हायकमांड विचारेल, तेव्हा आम्ही आमची मते मांडू. महाराष्ट्रातील सर्व चित्र हायकमांडसमोर ठेवू." त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या संभाव्य घरवापसीबाबत काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व काय भूमिका घेते आणि महाराष्ट्रातील पक्षनेत्यांच्या नाराजीची दखल घेतली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कर्जतमधील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित असलेल्या तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. या प्रकल्पासाठी 35 हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

महाराष्ट्राला वाळवंट होऊ देणार नाही

या प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या प्रमुखाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. महाराष्ट्राला वाळवंट होऊ देणार नाही, असा इशारा देताना त्यांनी वृक्षतोड तातडीने थांबवण्याची मागणी केली. कर्जतमधील वृक्षतोड थांबली नाही, तर काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com