मुंबई : 'ऑपरेशन गंगा'मधून (Operation Ganga) आज सकाळी सातवे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत (Mumbai) दाखल झाले. यावेळी युक्रेनमध्ये अडकलेले १८२ नागरिक देशात परतले. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विमानतळावर देशवासीयांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, मी विमानात जावून सर्वांना भेटलो. हे विद्यार्थी अतिशय भयभीत अवस्थेमध्ये होते. मी त्यांना सांगितले की तुम्ही भारतात सुखरुप पोहचले आहात. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन गंगा व्यवस्थित चालू आहे. मात्र अजून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारमधील ४ मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही माहिती राणे यांनी दिली.
सिंधुदुर्गस्थित युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यी यावेळी बोलताना म्हणाला, खूप आनंद होत आहे. मुंबईत पोहचलो आहे. सरकारकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण बॉर्डर क्रॉस करण्यासाठी बराच वेळ लागला. खूप गर्दी होती. मला माझ्या शहरापासून ८ किमी. चालत यावं लागलं. तसेच यापुढे देखील भारत सरकारने असाच प्रतिसाद देत माझ्या मित्र-मैत्रिणींना देखील बाहेर काढावं अशीही अपेक्षा त्यांने व्यक्त केली.
दरम्यान, युक्रेन-रशियामधील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. या दोन्ही उभय देशांमध्ये काल बेलारुस याठिकाणी शांतता चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण, युद्ध काही अद्याप सुरुच आहे. रशियाने पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागले, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.