<div class="paragraphs"><p>Sameer Wankhede and Shahrukh Khan,&nbsp;Aryan khan drugs case</p></div>

Sameer Wankhede and Shahrukh Khan, Aryan khan drugs case

 
File Photo
देश

मोठी बातमी : वानखेडे प्रकरणातून शाहरुखची माघार? मुंबई पोलिसांचा तपासाला ब्रेक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी (Aryan khan drugs case) प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासाला ब्रेक लावला असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेता शाहरुख (Shahrukh Khan) खानची मॅनेजर पुजा ददलानी (Puja Dadlani) हिने या प्रकरणात विशेष तपास पथकासमोर येवून अद्याप कोणताही जबाब न नोंदवल्याने पोलिसांचा तपास थंडावला असल्याचे दिसत आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) ताब्यात घेतल्यानंतर त्या रात्री साक्षीदार किरण गोसावी व अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांच्यात तडजोड झाल्याचा गौप्यस्फोट दुसरा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. याच कथित खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष चौकशी पथक) तयार करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली आणि लाच या दोन प्रकरणामध्ये ददलानीचा जबाब अत्यंत महत्वाचा आहे. पण तिचं समोर येत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र तिने प्रकृतीचे कारण सांगून उपस्थित न राहता वेळ मागून घेतली. त्यामुळेच पोलिसांना अद्यापही तिचा जबाब नोंदवता आला नाही.

परिणामी पूजा ददलानी पोलिसांना जबाब येत नाही, तोपर्यंत या प्रकरणी एफआयआर नोंदवता येणार नाही. एकूणच या प्रकरणात अद्याप पुजा समोर न आल्याने किंवा स्वतः शाहरुख खान देखील समोर येवून काहीच न बोललल्याने कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या कथित खंडणीवसूली प्रकरणातून शाहरुख खानने माघार घेतली आहे का असा सवाल विचारला जात आहे. एसआयटीने सध्या तपास थांबवला असून कायदेशीर सल्ला घेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT