Shakib Al Hasan Sarkarnama
देश

Shakib Al Hasan : खासदार होताच शाकिबला मस्ती; चाहत्याच्या थेट कानाखालीच दिली! व्हिडीओ व्हायरल...

Bangladesh Election 2024 : शाकिब दीड लाख मताधिक्याने विजयी

Sunil Balasaheb Dhumal

Bangladesh Political News : बांग्लादेशाची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा बांग्लादेशाच्या पंतप्रधानपदी शेख हसीना यांना संधी मिळणार आहे. या निवडणुकीत बांग्लादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन याने राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे. तो तब्बल दीड लाख मताधिक्याने खासदार बनला आहे. खासदार बनताच २४ तासांतच शाकिब याचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राजकारणात दमदार एन्ट्री केल्यानंतरही शाकिबने आपण क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खासदार आणि कर्णधार ही दोन्ही पदे सक्षमपणे पार पडण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला. मोठ्या मतांनी विजयी झाल्यानंतर शाकिबचा वादग्रस्त व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे शाकिबला मस्ती चढल्याची टीकाही होऊ लागली आहे. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या शाकिबची राजकीय सुरुवातही वादग्रस्तच झाली आहे.

बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याने हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी तब्बल 200 जागा जिंकल्या. त्यामुळे शेख हसीना यांच्या पक्षाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत क्रिकेटर शाकिब-अल-हसनही दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाला.

या विजयानंतर त्याने एका चाहत्याला जोरदार चापट मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे शाकिबवर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. परिणामी शाकिबच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत बांग्लादेशचा कर्णधार शाकिबला राजकीय विजयाचा कॉन्फिडन्स होता. त्याने निवडणुकीपूर्वीच आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही, असे सांगितले होते. त्यानुसार तो आता पश्चिम शहरातील मागुरा येथून खासदार झाला आहे. निवडणुकीमुळे तो न्यूझीलंड दौऱ्यापासून दूर होता.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT