Parliament Election : बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसिना यांनी इतिहास घडवत पाचव्यांचा सत्ता ताब्यात घेतली आहे. प्रमुख विरोधी पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या अवामी लीग पक्षाने 300 पैकी तब्बल 222 जागांवर विजय मिळवला आहे. तर अपक्षां 63 जागा मिळाल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्षासाठी अपेक्षित जागा मिळवण्यात इतर कोणत्याही पक्षाला यश आले नाही.
मागील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भारतातही भाजपने (BJP) घवघवीत यश मिळवत विरोधकांना धूळ चारली होती. सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला (congress) सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण विरोधी पक्षनेता म्हणून अपेक्षित जागांचा आकडा गाठता आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) करिष्मा सलग दुसऱ्या निवडणुकीत चालला होता. असाच करिष्मा शेख हसिना यांनीही करून दाखवला आहे.
बांग्लादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या जतिया पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. या पक्षाला केवळ 11 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे शेख हसिना यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्याचप्रमाणे निवडून आलेले बहुतेक अपक्षही त्यांच्याच पक्षाचे असल्याचे मानले जाते. तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनाच शेख हसिना यांनी डमी उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डमी उमेदवारांवरून आता राजकारण तापले आहे. जगासमोर ही निवडणूक एकतर्फी वाटू नये, सर्व पक्षांचा सहभाग असल्याचे वाटावे म्हणून डमी उमेदवार उभे केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता संसदही डमी असेल, असा आरापो तेथील सामाजिक कार्यकर्ते शाहिदुल आलम यांनी केला आहे.
हसिना यांचा अडीच लाखांनी विजय
शेख हसिना यांनी गोपाळगंज-३ मतदारसंघातून आठव्यांचा विजय मिळवला आहे. त्यांनी 1986 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना तब्बल 2 लाख 49 हजार 965 मते मिळाली. तर विरोधी एम निझामुद्दीन लष्कर यांना केवळ 469 मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.