Shankaracharya Avimukteshwaranand, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पाठिशी उभे राहिले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद; ‘हिंदू’ विधानावर म्हणाले... 

Rajanand More

New Delhi : काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूंविषयीच्या विधानावर वाद निर्माण झाला आहे. लोकसभेतील भाषणात राहुल यांनी हिंदू हिंसक असल्याचे विधान केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती राहुल गांधी यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.   

राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल असे म्हणालेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी राहुल गांधींचे संपूर्ण भाषण ऐकले. हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, असे ते स्पष्टपणे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा याबाबतचा व्हिडिओ काँग्रेसने एक्सव पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, राहुल गांधी कुठेही हिंदू धर्माविरोधात बोलत नाही. राहुल गांधी यांचे अर्धवट विधान पसरवणे गुन्हा आहे. असे करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी.

राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना लोकसभेत जोरदार भाषण दिले होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, (सत्ताधारी बाकांकडे पाहून) जे लोक स्वत:ला हिंदू मानतात, ते 24 तास हिंसा करतात. तुम्ही हिंदू नाहीत. हिंदू धर्मात स्पष्टपणे म्हटले आहे की, सत्याची साथ द्यायला हवी.

राहुल यांच्या या विधानानंतर सत्ताधारी खासदारांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर असल्याचे मोदी म्हणाले होते. त्यावर राहुल यांनी नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, आरएसएस, भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, असा पलटवार केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT