Ramniwas Rawat : अजब राजकारण! काँग्रेसचे आमदार भाजप सरकारमध्ये बनले मुख्यमंत्री…

Madhya Pradesh BJP Government Congress Jitendra Patwari : काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार रामनिवास रावत यांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Ramniwas Rawat with CM Mohan Yadav
Ramniwas Rawat with CM Mohan YadavSarkarnama
Published on
Updated on

Bhopal : राजकारणात कधी कोणता ट्विस्ट येईल, हे सांगता येत नाही. अशीच मोठी राजकीय घडामोड मध्य प्रदेशातून समोर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराला मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

रामनिवास रावत असे या आमदारांचे नाव आहे. त्यांना सोमवारी राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्यांनी अद्यापही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. विजयपूर मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

Ramniwas Rawat with CM Mohan Yadav
Shantanu Thakur : मोदींच्या मंत्र्यांनीच ‘बीफ’ वाहतुकीसाठी दिला पास; खुलासा करताना दमछाक...

आमदारकीचा राजीनामा न देताच रावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पटवारी यांनी भाजपने लोकशाही आणि संविधानाचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

सरकार आणि विरोधक वेगळे असतात, हे परंपरा आहे. पण लोकशाही हत्या खुर्चीच्या सौदेबाजीसाठी कुख्यात भाजपने काँग्रेस आमदारालाच मंत्रिपदाची शपथ दिली. काँग्रेस आमदार रानिवास रावत यांची आमदारकी रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे आवश्यक पुराव्यांसह प्रस्ताव सादर केला होता. पण त्यांनी कर्तव्याचे पालन केले नाही, असे पटवारी यांनी स्पष्ट केले आहे.

Ramniwas Rawat with CM Mohan Yadav
Ramniwas Rawat : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायला गेले अन् राज्यमंत्रिपदाची घेतली; पुढे काय झालं?

पटवारी यांनी राज्यपालांवरही टीका केली. राज्यपालांनीही संविधान आणि लोकशाहीच्या परंपरेचे पालन करायला हवे होते. कारण ते पक्ष नव्हे तर संविधानाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. पण संविधानिक पदावरूनही आक्षेप घेण्यात आला नाही, अशी नाराजी पटवारी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शपथ घेण्यापुर्वी रावत यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. पण रावत हे अजूनही आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पक्षांतरबंदी कायद्यानुसार रावत यांच्यावर कारवाई का झाली नाही, कारवाई होणार की नाही, यावरून आता कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com