Narendra Modi - Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar : राजकीय घडामोडींना वेग; आधी भेटीगाठी अन् आता पवारांचं थेट PM मोदींना पत्र; समोर आलं 'हे' मोठं कारण?

Sharad Pawar letter to PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट शरद पवारांची भेट घेतली. यानंतर अमित शाह हेदेखील पवारांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा आहे. यातच आता दिल्लीतून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असतानाच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. यानंतर अमित शाह हेदेखील पवारांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा आहे. यातच आता दिल्लीतून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती आहे. या पत्राद्वारे दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती पवारांनी मोदींना केली आहे. दिल्लीत होत असलेल्या यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार आहे. पवारांच्या पत्राबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महाराष्ट्रातील मातृभाषा असलेल्या मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाल्यानंतर पहिलंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होत आहे.त्यामुळे या साहित्य संमेलनाची राज्यासह दिल्ली दरबारी जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्विकारलं आहे.

यंदाचं हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून ते 21 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान राजधानी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल 70 वर्षांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

शरद पवारांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड या चार ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटनाचा मान शरद पवार यांना मिळाला होता. पण पवार हे पहिल्यांदाच संमेलन स्वागताध्यक्षाची भूमिका निभावणार आहे. छगन भुजबळ, मनोहर जोशी, दत्ता मेघे, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे या राजकीय नेत्यांनी स्वागताध्यक्षपद सांभाळलेलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT