Maharashtra DCM : 'उपमुख्यमंत्र्यांच्या छातीवर नंबर एक, नंबर दोनचे बॅच लावा', काँग्रेस नेत्याचा शिंदे, पवारांना खोचक टोला

Mahayuti Cabinet Portfolio Distribution Issues : अमर्याद सत्ता हाती आल्यानंतर युतीच्या डोक्यात हवा गेल्याचे दिसत आहे. आत नंबर दोनसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये भांडण सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर महायुतीचे गाडे आता खातेवाटपावर अडले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे विशिष्ट खात्यांसाठी आग्रही असल्याने खातेवाटपास उशीर होत असल्याची चर्चा आहे. मात्र, माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी या चर्चांमधील हवाच काढून घेतली. खातेवाटपासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बार्गेनिंग पॉवरच राहिली नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रामध्ये महायुतीला अनपेक्षित यश मिळाले आहे. अमर्याद सत्ता हाती आल्यानंतर युतीच्या डोक्यात हवा गेल्याचे दिसत आहे. आत नंबर दोनसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये भांडण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाणे एक नंबर की पुणे एक नंबर हे ठरवावे. तसेच उपमुख्यमंत्री एक, उपमुख्यमंत्री दोन असे त्यांच्या छातीला बॅच लावावेत. त्यामुळे आम्हाला सभागृहात प्रश्न विचारणे त्यांना सोपे जाईल, असाही टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Eknath Shinde, Ajit Pawar
Congress News : पराभवाला ईव्हीएम जबाबदार नाही, काँग्रेस नेत्याने सांगितले वेगळेच कारण

'फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरही अद्याप खातेवाटप झालेले नाही. हे बघता खातेवाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र यात काही तथ्य नाही. भाजप या दोघांना जे देईल ते खाते त्यांना घ्यावे लागले. नकार देण्याचीही त्यांची सोय राहिली नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा नाईलाज आहे. भाजप जे खाते देईल ते मुकाट्याने ते घ्यावे लागणार', असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

लोकशाही धोक्यात

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यावर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएमध्ये घोळ असल्याची शंका आहे. पारदर्शकपणे मतदान होत नसल्याचे दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाने या विरोधातील याचिका फेटाळली असली तरी ईव्हीएमवर शंका दूर करणे निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्थेची जबाबदारी आहे. अन्यथा लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी वर्तविली.

Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar : पुढचा पाडवा एकत्र? शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर युगेंद्र अन् रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, "आमचं कुटुंब कधीच..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com