Sharad Pawar, Rahul Gandhi Sarkarnama
देश

INDIA Alliance Meeting : शरद पवार-राहुल गांधींची भेट; इंडिया आघाडीची रणनीती ठरणार

Sharad Pawar Meet Rahul Gandhi : मुंबईनंतर 'इंडिया'त चर्चा झाली नसल्याने लवकरच बैठक होण्याची शक्यता

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया आघाडी व भाजपकडून रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी आगामी काळात इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात व वाटचालीबाबत चर्चा केल्याचे समजते. (Latest Political News)

मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला इंडिया आघाडीची शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर इंडिया आघाडीची (INDIA Alliance) बैठक झालेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी राहुल गांधी, मलिकार्जुन खर्गे यांच्यासोबत जवळपास ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

या वेळी इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीचे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा झाली. त्यामुळे येत्या काळात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या काळात इंडिया आघाडीची बैठक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बैठकीत बराचसा गॅप पडला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची आगामी वाटचाल कशी असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचीही लोकसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरातून एकहाती सत्ता राखता येईल, असेच संख्याबळ मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. भाजपच्या या प्रयत्नांना खीळ घालण्याचे मोठे आव्हान सध्या तरी इंडिया आघाडीपुढे आहे. त्यादृष्टीने इंडिया आघाडी कशी रणनीती आखते, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT