Hasan Mushrif Money laundering case : मनी लाँड्रिंगप्रकरणी मुश्रीफांच्या अडचणी पुन्हा वाढणार ?

Hasan Mushrif News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
Hasan Mushrif Money laundering case :
Hasan Mushrif Money laundering case : Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लाँड्रिंगप्रकरणी मंंत्री हसन मुश्रीफ यांचे CA महेश गुरव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे मुश्रीफांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले होते. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांतून मिळालेल्या पैशांचीही गुरव यांना पूर्ण कल्पना होती. इतकेच नव्हे तर हा पैसा शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Hasan Mushrif Money laundering case :
Jarange Patil News : जरांगे पाटलांच्या सभेचा लाभ कोणाला, तोटा कोणाला?

मुश्रीफांवर काय आहेत आरोप?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. कारखान्याच्या नावाखाली मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणी मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याचबरोबर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफांनी फसवणूक केल्याची 25 शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यापूर्वी मुरगूड पोलिस स्टेशनमध्येही त्यांच्याविरोधात काही शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती.

मुश्रीफांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड, बेलेवाडी याचे सभासद होण्यासाठी आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी कोणत्याही शेतकऱ्याला सभासदपद दिले नाही. याउलट मुश्रीफांनी त्यांच्याच कुटुंबातील लोकांच्या व काही एलएलपी कंपनीच्या नावे हा साखर कारखाना केल्याचे या तक्रारीत म्हटले होते.

मुश्रीफांनी केवळ शेतकऱ्यांकडून पैसे जमा केलेले आहेत. त्यांनी या कारखान्यांमध्ये सभासद करून घेतो, असे सांगून प्रत्येक शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये घेतले; पण शेअर्स दिले नाहीत. सभासदही केले नाही. या सर्वातून शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Hasan Mushrif Money laundering case :
Ajit Pawar News : पवारांच्या दौऱ्याने तरी दिंडोरीच्या रस्त्यांचे भाग्य उजळेल ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com