Sharad Pawar In Action News Sarkarnama
देश

Sharad Pawar News : पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; देशात परिवर्तन दिसेल...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : बिहारमध्ये होणाऱ्या 23 जूनच्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी सांगितले. तसेच भाजपच्या विरोधात एकत्र येत निवडणुकीसा सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शनिवारी वर्धापनदिन होता. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, हे वर्ष महत्त्वाचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातील. देशात परिवर्तन येईल आणि परिवर्तन दिसेल. मला आठवते की 1977 मध्ये देशात अशीच परिस्थिती होती.

समोर एकही नेता नव्हता. लोकांनी बदल करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या वेळी देशात नवे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जनता पक्ष सत्तेवर आला. अशीच परिस्थिती आज देशात दिसून येत आहे. विविध विचारसरणीच्या पक्षांना किमान समान कार्यक्रमावर पुढे जाण्याची तयारी ठेवून हातात हात घालून चालावे लागेल.

मला खात्री आहे की या बदलासाठी देशातील जनता या सर्वांना मदत करेल. 23 जून रोजी बिहारमध्ये सर्व विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठरवू. आम्ही संपूर्ण देशाचा दौरा करून ते कार्यक्रम लोकांसमोर मांडू आणि देशवासियांना परिवर्तनाचा मार्ग दाखवून देशाची स्थिती बदलण्यावर भर देणार आहोत. हा विश्वास मी येथे व्यक्त करतो, असेही पवार म्हणाले.

हा बदल घडवायचा असेल तर संघटना मजबूत करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक, युवती, महिला, अल्पसंख्याक, शेतकरी व इतर सर्व सेलचे लोक एकजुटीने काम करून, देशात परिवर्तन घडवून आणतील, असेही पवार यांनी नुमद केले. तसेच ज्या ठिकाणी भाजपची (BJP) ताकद आहे, तेथे सर्व विरोधी एकत्र येवून त्यांच्या विरोधात लढणार आहोत, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT