Suhas Palashikar, Yogendra Yadav News : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव हे इयत्ता नववी ते बारावीच्या एसीईआरटीच्या राज्यशास्त्राच्या (Political Science) पुस्तकांचे मुख्य सल्लागार आहेत. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकतर्फी व अतार्किक बदल केल्यामुळे या दोघांनीही संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकांमधील मजकूर मनमानीपूर्वक वगळल्यामुळे पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी एनसीईआरटीचे सल्लागारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात सुहास पळशीकर व योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी एनसीईआरटीला शुक्रवारी (ता.९) पत्र लिहिले.
या पत्रामध्ये सुहास पळशीकर (Suhas Palashikar) आणि योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, ''मुख्य सल्लागार म्हणून राज्यशास्त्राच्या पुस्तकात असलेली आमची नावे काढून टाकावी. पाठ्यपुस्तकांचे तर्कशुद्धीकरण करण्याच्या नावाखाली त्यांचे विकृतीकरण केले. ज्यामुळे ही पुस्तके शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरत आहेत.
पुस्तक तर्कसंगत बनवण्याच्या नावाखाली त्यात अतार्किक बदल योग्य ठरवला आहे. मात्र, त्यातला तर्क आम्हाला समजला नाही. पाठ्यपुस्तकांचे विकृतीकरण केले. यात मोठ्या प्रमाणात अतार्किक मोडतोड करण्यात आली. तसेच बऱ्याचशा गोष्टी हटवल्या आहे. तर्कसंगतीच्या नावाखाली अशा प्रकारे केलेल्या बदलांचे समर्थन होऊ शकत नाही.
यामध्ये आम्हाला कोणताही अध्यापनशास्त्रीय तर्क दिसत नाही. या पाठयपुस्तकांमधील मजकूर ओळखता न येण्याइतका विकृत केला आहे. अनेक ठिकाणी तर्कहीन संपादन करून मोठया प्रमाणात मजकूर वगळला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ११ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातून गुजरात दंगलीचा बराचसा भाग वगळण्यात आला होता. मात्र, यावर एनसीईआरटीने म्हटले होते की, पाठ्यपुस्तक तर्कसंगत बनवण्यासाठी काही बदल करण्यात आले आहे.
पळशीकर व योगेंद्र यादव यांच्या पत्रावर एनसीईआरटीने म्हटले आहे की, शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तके विषयावरील ज्ञान व आकलनाच्या आधारे विकसित केली जातात. यामध्ये वैयक्तिक लेखनाचा दावा केला जात नाही.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.